मुख्य सामग्रीवर वगळा

अंत्यसंस्काराचे प्रकार

आयुष्याचा अखेरचा टप्पा म्हणजे मृत्यू...

पण मृत्यू जरी सारखा असला तरी मृत शरीराची विल्हेवाट लावण्याचे निरनिराळे प्रकार आपल्या वेगवेगळ्या संस्कृतीत पाहायला मिळतात. मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्काराच्या पूर्व तयारीपासून मृत देहाच्या विल्हेवाटीचे मुख्यतः सहा प्रकार प्रसिद्ध आहेत.

१) मृतदेहास अग्नी देण्याची प्रथा -




अगदी प्राचीन काळापासूनच ग्रीक व रोमन समाजात मृतदेहाला अग्नी देण्याची प्रथा होती. हिंदू व बौध्द यांच्यात दहनाची प्रथा आजपर्यंत चालू आहे. दहन झाल्यानंतर ज्या अस्थी राहतात, त्यांना विधिपूर्वक पुरतात किंवा पवित्र नदीत त्यांचे विसर्जन केले जाते.

२) मृतदेह जसाच्या तसा टिकविणे -




वाळवंटी प्रदेशातल्या जमाती कोरड्या वाळूत खड्डा खणून मृत देहाला ठेवीत. अशा वातावरणात मृतदेह बराच काळ टिकतो. प्राचीन काळी इजिप्तमध्ये राजे व राण्या यांच्या मृतदेहांना टिकवण्याकरिता विशिष्ट प्रकारचे लेप लावून "ममी" तयार करीत असत. त्यांच्या मृतदेहाजवळ त्यांच्या प्रिय वस्तू, हत्यारे, अलंकार व त्यांचा मनुष्यपरिवारही पुरत असत. 

३) मृतदेह व्यवस्थित पुरणे -




मृतदेहास स्वतःच्या घरात, अंगणात, देवळाच्या परिसरात, शेतात, स्मशानभूमीत, दगडी गुहेत वा झाडाच्या ढोलीत मृतास बसवून वा निजवून पुरतात. मृतदेहाला जेथे पुरतात तेथे त्याला जिवंतपणी लागणाऱ्या वस्तू म्हणजेच अन्न, मद्य, हत्यारे इ. वस्तू पुरतात. पूर्वीच्या काळी जेव्हा एखादे मोठे सरदार पुरोहित वा नामवंत व्यक्ती पुरले जात, तेव्हा त्यांचा दास, बायको, वाहन इत्यादीही पुरत असत परंतु ही प्रथा आता लुप्त झाली आहे.

४) जलात विसर्जन करण्याची प्रथा -




पवित्र महानद्यांच्या काठी राहणाऱ्या मृत साधू संन्याशांना, मृत खलाशांना, समुद्रप्रवाशांना, गुलाम, बेवारस मृतदेहांना वस्त्र गुंडाळून, दगड बांधून किंवा अन्य प्रकारे नदीत वा समुद्रात टाकून देतात. आजच्या युगात अशा प्रकारे अंत्यविधी संस्कार खूप कमी वेळा पाहायला मिळतात.

५) हिंस्त्र पशूंनी मृतदेह खाऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची प्रथा -




हिंस्त्र पक्ष्यांनी वा प्राण्यांनी प्रेत खाऊन टाकावे असा या प्रथेचा उद्देश असतो. पारशी लोक "दख्म" म्हणजे कोरड्या विहिरीत किंवा उंच बांधलेल्या वाटोळ्या व खोल मनोऱ्यात हिंस्त्र पक्ष्यांनी खाऊन टाकण्याकरिता प्रेत ठेवतात. बर्फाच्छादित प्रदेशात कायम राहणाऱ्या जमाती प्रेतास उंच जागेवर बांधून ठेवतात व बर्फ वितळल्यावर जमिनीत पुरून टाकतात. 

६) मृतदेहाचे मांस समारंभाने भक्षण करण्याची प्रथा -




अशी पद्धत आपल्याला ऑस्टेलिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही वन्यजमातींत आढळते. एखादी व्यक्ती मृत पावल्यावर एका विशेष समारंभाचे आयोजन करून त्या मृतदेहाचे तुकडे करून त्याचे मांस भक्षण केले जाते.

अशा प्रकारे विविध संस्कृतीनुसार आणि भौगोलिक रचनेनुसार प्रत्येक समजात अंत्यविधी केले जातात. बदलत्या काळानुसार आपल्याला त्यात परिवर्तने झालेली दिसून येतात. आपल्या भारतात हि मृतदेहांच्या समाध्या, थडगी, कबरी, स्तूप, स्तंभ इ. प्रकारची मृताबद्दल आदर आणि सामाजिक दर्जा दाखविणारी स्मारके बांधली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात.

टिप्पण्या

  1. काही पध्दती नव्याने कळल्या,सहावा प्रकार पण असू शकतो हे माहीत न्हवते.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्येक रुढी परंपरा ह्या त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. आणी बर्याच अंशी त्या योग्य असतात

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...

श्रीरामांचा दलित मित्र - राजा निषादराज

दूरदर्शन वर रामायण लागल्यामुळे फुरोगामी लोकांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पना धुळीला मिळवल्या जात आहेत, म्हणुनच कदाचित रामायणाला त्यांचा विरोध असावा. त्यांच्या जातीद्वेषाच्या अजेंड्याला छेद देणारा प्रसंग असा... रामायणातील एका प्रसंगात निषादराज श्रीरामासोबत बसत नाहीत आणि म्हणतात, "मी खालच्या जातीचा आहे. मी श्रीरामासोबत कस बसु...?? तेव्हा महर्षी भारद्वाज ऋषी म्हणतात की, "तुम्ही श्रीरामासोबत शिकला आहात, श्रीरामाचे मित्र आहात. कधी श्रीरामाने उच्च नीचता ठेवली आहे...?? तुम्ही श्रीरामाच्या सोबतच बसा..." निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते एका राज्याचे राजा आहेत म्हणजे दलित राज्य कारभार सुद्धा करु शकत होते ही गोष्ट सिद्ध होते.... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी त्यांनी श्रीरामासोबत शिक्षण घेतलय म्हणजे दलित असो वा कोणी सर्वांना शिक्षण मिळत असे... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते श्रीरामाचे मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिल... आणि खुद्द एका ब्राह्मण ऋषींच्या आश्रमात ते स्वतःहुन खा...