मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीरामांचा दलित मित्र - राजा निषादराज


दूरदर्शन वर रामायण लागल्यामुळे फुरोगामी लोकांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पना धुळीला मिळवल्या जात आहेत, म्हणुनच कदाचित रामायणाला त्यांचा विरोध असावा.

त्यांच्या जातीद्वेषाच्या अजेंड्याला छेद देणारा प्रसंग असा...

रामायणातील एका प्रसंगात निषादराज श्रीरामासोबत बसत नाहीत आणि म्हणतात, "मी खालच्या जातीचा आहे. मी श्रीरामासोबत कस बसु...??


तेव्हा महर्षी भारद्वाज ऋषी म्हणतात की, "तुम्ही श्रीरामासोबत शिकला आहात, श्रीरामाचे मित्र आहात. कधी श्रीरामाने उच्च नीचता ठेवली आहे...?? तुम्ही श्रीरामाच्या सोबतच बसा..."



  • निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते एका राज्याचे राजा आहेत म्हणजे दलित राज्य कारभार सुद्धा करु शकत होते ही गोष्ट सिद्ध होते....

  • निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी त्यांनी श्रीरामासोबत शिक्षण घेतलय म्हणजे दलित असो वा कोणी सर्वांना शिक्षण मिळत असे...

  • निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते श्रीरामाचे मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिल...

  • आणि खुद्द एका ब्राह्मण ऋषींच्या आश्रमात ते स्वतःहुन खाली बसत असताना त्यांना त्या ब्राह्मण ऋषींनी खाली न बसता सगळ्यांसोबत वर बसायला सांगितलं... 

म्हणजे यातुन लक्षात येत की ब्राह्मण ऋषी असो किंवा क्षत्रिय असो अथवा आणखी कोणी सर्वांना समान मानलं जायच कारण सर्वच एका ठिकाणी एकमेकांसोबत बसले आहेत....!! 

या प्रसंगातुनच एक लक्षात येत की कितीही विषमता दाखवण्याचा प्रयत्न झाला तरी आपल्या जुन्या ग्रंथात सम विषम अस काही नव्हतच मुळी...

काही फुरोगाम्यांनी जाती जातीत भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आणि दोष मात्र आमच्या हिंदु संस्कृतीला दिला...

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरियाची भारतीय महाराणी

हजारो वर्षापूर्वी घडलेल्या रामायणाचा, प्रभू श्री रामांचा इतिहास आपणा सर्वाना माहितच आहे, पण आज आपण अयोध्येच्या इतिहासातील एका दुर्लक्षित अध्यायाकडे पाहूया...!! सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. ज्या वंशात राणी सुरीरत्ना यांचा विवाह झाला त्याला दक्षिण कोरियात "करक वंश" या नावाने ओळ्खल जात. या करक वंशाकडे दक्षिण आणि उत्तर कोरियातील बऱ्याच भूभागाची खूप वर्ष सत्ता होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील "किम" आडनावाची लोक करक वंशातील आहेत अस मानल जात. "किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात. राण...

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

अंत्यसंस्काराचे प्रकार

आयुष्याचा अखेरचा टप्पा म्हणजे मृत्यू... पण मृत्यू जरी सारखा असला तरी मृत शरीराची विल्हेवाट लावण्याचे निरनिराळे प्रकार आपल्या वेगवेगळ्या संस्कृतीत पाहायला मिळतात. मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्काराच्या पूर्व तयारीपासून मृत देहाच्या विल्हेवाटीचे मुख्यतः सहा प्रकार प्रसिद्ध आहेत. १) मृतदेहास अग्नी देण्याची प्रथा - अगदी प्राचीन काळापासूनच ग्रीक व रोमन समाजात मृतदेहाला अग्नी देण्याची प्रथा होती. हिंदू व बौध्द यांच्यात दहनाची प्रथा आजपर्यंत चालू आहे. दहन झाल्यानंतर ज्या अस्थी राहतात, त्यांना विधिपूर्वक पुरतात किंवा पवित्र नदीत त्यांचे विसर्जन केले जाते. २) मृतदेह जसाच्या तसा टिकविणे - वाळवंटी प्रदेशातल्या जमाती कोरड्या वाळूत खड्डा खणून मृत देहाला ठेवीत. अशा वातावरणात मृतदेह बराच काळ टिकतो. प्राचीन काळी इजिप्तमध्ये राजे व राण्या यांच्या मृतदेहांना टिकवण्याकरिता विशिष्ट प्रकारचे लेप लावून "ममी" तयार करीत असत. त्यांच्या मृतदेहाजवळ त्यांच्या प्रिय वस्तू, हत्यारे, अलंकार व त्यांचा मनुष्यपरिवारही पुरत असत.  ३) मृतदेह व्यवस्थित पुरणे - मृतदेहास स्...