मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

विक्रमशीला लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विक्रमशीला विद्यापीठ

विक्रमशीला विद्यापीठाची स्थापना ८ व्या शतकात पाल साम्राज्याने केली. आज विक्रमशीला विद्यापीठाबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे आणि बऱ्याच लोकांना तर माहिती ही नाही की या नावाचे जागतिक किर्तीचे विद्यापीठ आपल्या भारतात होऊन गेले. नालंदा विद्यापीठाप्रमाणे येथे ही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असतं. तिबेटी परंपरेनुसार मगधचा पालवंशी राजा धर्मपाल याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता आणि त्याने विक्रमशीला विहाराची स्थापना केली. या विहाराची पुढे प्रसिद्धी ‘विक्रमशीला विद्यापीठा’त परिणती झाली. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव "विक्रमशीला" ठेवण्यात आले. पाटणा विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास व संस्कृती या विभागाने १९६० ते ६९ मध्ये बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील अँटिकच येथे उत्खनन केले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यानेही १९७२-७३ पासून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून विक्रमशीला विद्यापीठाचे अवशेष शोधून काढले. सुमारे १०० एकर परिसरात सापडलेले भव्य मठ, पाषाणाच्या बुद्धप्रतिमा, मोहोरा, स्तूप आणि भव्य जलाशये त्या काळाची ग्वाही देतात. विक्रमशील...