टायटॅनिक त्याकाळचे सर्वोत्तम आणि सर्वात मोठे जहाज... कधीच बुडणार नाही अशी ज्याची जाहिरात झाली ते जहाज आपल्या पहिल्याच प्रवासात बुडाले. तेव्हा जवळजवळ तीन जहाजे त्याच्या जवळपास होती. त्यापैकी एक होते "सॅम्पसन" जे टायटॅनिकपासून ७ मैल दूर होते. त्यांनी धोका दर्शविणारा पांढऱ्या उजेडाच्या आकाशात उडवलेल्या दारूगोळ्याना पाहिले पण ते बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते व जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो तर पकडले जावू म्हणून ते मागे वळून टायटॅनिकच्या उलट दिशेने निघून गेले. हे जहाज आपल्यापैकी त्या "स्वार्थी हिंदूंचं" प्रतिनिधित्व करतात जे हिंदू आपल्या स्वत: च्या पापामध्ये इतके व्यस्त आहेत आपला भारत देश बुडत आहे त्याला आपली गरज आहे हे ओळखू शकत नाही ...! दुसरे जहाज "कॅलिफोर्निया" होते. जे टायटॅनिकपासून फक्त १४ मैलांवरच होते, पण चोहोबाजूंनी हिमनगांनी वेढलेले. त्याच्या कप्तानाने बाहेर बघितले आणि संकटात सापडल्याचा इशारा देणाऱ्या पांढऱ्या फ्लेयर्स पाहिल्या. परंतु परिस्थिती अनुकूल नव्हती आणि अंधारलेली होती म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला व झोपी गेला व क्र...