मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

sushrut लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आचार्य सुश्रुत - प्लास्टिक सर्जरीचे जनक

सुश्रुत ऋषी हे प्राचीन काळातील भारतीय आयुर्वेदाचार्य आणि शल्यतंत्रपारंगत (प्लास्टिक सर्जरी विशेषज्ञ). ते भारतीय शल्यतंत्राचे आद्य प्रणेते मानले जातात. त्यांचा काल व चरित्रात्मक तपशील निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली येथील एन्. एल्. केसवानी ह्यांच्या मते, सुश्रुतांच्या काळाची पूर्वमर्यादा इ. स. पू. ६०० ही होय. सुश्रुत हे दिवोदास काशीराज या धन्वंतरीचे शिष्य होते, असा उल्लेख हेमाद्रिकृत लक्षणप्रकाशा तील अश्वप्रकरणामधील एका श्लोकात आला आहे. यूरोप, अरबस्तान, ग्रीस, कंबोडिया आणि इंडोचायना येथे नवव्या व दहाव्या शतकांत सुश्रुतांचे नाव माहीत झाले होते. अरबस्तानातील वैद्य राझी (इ. स. पू. पहिले शतक) यांनी सुश्रुतांच्या ग्रंथातून शल्यक्रियेचे तंत्र माहीत झाल्याचा उल्लेख त्यांच्या ग्रंथात केला आहे. सुश्रुत संहिता या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या १२० पेक्षा अधिक हत्यारांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात शस्त्रक्रियांचे आठ भागात वर्गीकरण केले गेले आहे.छेदन, भेदन, लेखन, आहरण , व्याधन, इसण, स्रवण, ...