७ व्या शतकापूर्वी भारतात जैन आणि बौद्ध हे धर्म नव्याने उदयाला आले होते. त्यांना त्यावेळी राजाश्रय ही प्रचंड होता. आणि काळाच्या ओघात आक्रमकांशी लढता लढता हिंदु राजे अतिशय अल्प प्रमाणात राहिले होते. सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात झालेल्या आपसातील लढायांमध्ये हिंदु धर्माला पायदळी तुडवण्याचे अनेक प्रयत्न इतर धर्मीय राजांकडून झाले. त्या जोडीला देशातील शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक असे संप्रदाय वैदिक धर्माला आतून पोखरीत होतेच. या शतकात तांत्रिकांचा उदय झाला आणि तंत्रविद्येच्या नावाखाली अनाचाराचे थैमान चालू झाले. उपासनेच्या नावाखाली सामान्य लोकांची दिशाभूल केली जाऊ लागली. खरा हिंदु धर्म गडप झाला होता. भारतात सर्वत्र धार्मिक अराजक माजले होते. पण म्हणतात ना होणारा प्रत्येक सूर्यास्त त्याच्यासोबत एक नवा सूर्योदय घेऊन येतो. अशा अंधकार माजलेल्या परिस्थितीत आद्य शंकराचार्यांचा जन्म केरळ (मलबार) प्रांतात पूर्णानदीच्या काठी, कालडी ग्रामी इ.स. ७८८ मध्ये एका नंबुद्री ब्राम्हणाच्या कुळात झाला. लहानपणीच वडील गेल्याने त्यांची जोपासना आर्यांबा या त्यांच्या मातेने केली. त्यांच्या वडिलांचे नाव शिवगु...