नाव ऐकून तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल ना? साठमारी डागदारी नक्की काय प्रकार आहे?? तर ही आहेत खेळांची नावे...आपल्या मातीत घडलेल्या देशी मर्दानी खेळांची नावे... पूर्वी राजे महाराजे करमणुकीसाठी विविध खेळांचे आयोजन करत. त्यात मदांध हत्तींशी झुंजायची ही स्पर्धा असायची. या मदांध हत्तींशी झुंजायचा खेळ म्हणजे साठमारी डागदारी .. अठराव्या एकोणिसाव्या शतकात कोल्हापूर आणि बडोद्याच्या संस्थानात हा खेळ अत्यंत लोकप्रिय होता. राज्याच्या भेटीस येणाऱ्या पाहुण्यांसाठी या साठमारी डागदारी चे आयोजन केले जात असे. या खेळासाठी खुराक देऊन हत्ती तयार केले जायचे आणि खेळाच्या वेळी त्यांना दारू पाजून व भांगेच्या वड्या खायला घालून मदांध केलं जायचं. हातात कोणतेही शस्त्र न घेता हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी डागदारी साठी खास प्रशिक्षण देऊन तयार माणसे केली होती. या खेळात मदांध हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येकी २० माणसांचे ३ गट केले जायचे. हे तीन गट मिळून माणसांची संख्या ६० व त्यांच्या हत्यारांची संख्याही ६० होत असल्याने त्यांच्याप...