मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

hindu लेबलसह पोस्ट दाखवत आहे

छत्रपती शिवराय आणि धर्मांध पोर्तुगीज ख्रिश्चन

ज्यांना वाटत छत्रपती शिवराय "सेक्युलर" होते हे त्यांच्यासाठी...!! महाराज इतर धर्मांचा आदर करत असले तरी हिंदु धर्माचा अनादर त्यांनी कधीच सहन केला नाही. तर गोष्ट आहे १६६३ मधली... तळकोकणात पोर्तुगीजांची मस्ती वाढली होती. स्थानिक हिंदुंचे धर्मांतर करुन त्यांना बाटवण्यात येत होते. हे सर्व समजताच छत्रपती शिवरायांनी तत्काळ तेथील फ्रान्सिस्को तोवेरा याला पत्र लिहून जाब विचारला. मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. स्वत: महाराज व तान्हाजीराव मालुसरे हे ३००० सैन्यानिशी तिथे बारीक लक्ष ठेवून होते. एका रात्री सुमारे ५०० पोर्तुगीज व ४ पाद्री हे हातामधे क्रॉस घेवून धर्मांतर करण्यासाठी मांडवी नदी पार करुन एका वस्तीच्या दिशेने जाताना आढळले. हे पाहताच महाराजांनी ताबडतोब त्यांच्यावर हल्ला केला. ३००० मराठ्यांनी मिळून त्यांना छाटायला सुरवात केली. २००-२५० पोर्तुगीज ठार झाले. हातात क्रॉस घेवुन चालणाऱ्या त्या चारही पाद्रींचे हात दंडापासून तोडले. मराठ्यांचा हा रुद्रावतार पाहून सगळे पोर्तुगीज वाट मिळेल तिथे पळत सुटले. अर्ध्याहून अधिक पोर्तुगीज सैन्याच्या मृतदेहांचा खच तिथे पडला. हात तोडलेल्या त्या लोक...

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...

सनातन धर्माला नवसंजीवनी देणारा - पुष्यमित्र शुंग

     प्राचीन भारताचा इतिहास इतका समृद्ध आहे कि, प्रत्येक कालखंडात आपल्याला अनेक शूरवीर योद्धे पाहावयास मिळतात. अनेक शूरवीर काळाच्या ओघात विस्मृतीतही गेले. त्यातीलच एक म्हणजे शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती पुष्यमित्र शुंग ....       मौर्य वंशानंतर ख्रि. पू. सु . १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. तत्पूर्वी आचार्य चाणक्य यांच्या निधनानंतर अखंड हिदुस्तानाची त्यांची कल्पना क्षीण झाली होती. चंद्रगुप्त मौर्याने ही जैन धर्माचा स्वीकार केला होता. चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा बिंदुसार गादीवर येताच त्याने राज्याच्या सीमा दक्षिणेपर्यंत वाढवल्या. या पराक्रमी राजाच्या काळात मौर्य साम्राज्याने अनेक राज्ये जिंकून घेतली. त्यानंतर गादीवर बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक आला. पराक्रमी असणाऱ्या सम्राट अशोकाने कलिंगच्या युध्दानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर सुमारे २० वर्ष सम्राट अशोकाने राज्य केले.       ज्या भारतभूमीत जग जिंकायला निघालेला ग्रीकचा अलेक्झांडर ही पराभूत झाला तिथले शूरवीर मौर्य साम्राज्याच्या पराकोटी...

सिंध मधील शेवटचा हिंदु राजा - राजा दाहीर

भारतात अनेक थोर पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले. आपल्याला सातत्याने त्यांच्याबद्दल ग्रंथ, पुस्तके आणि चित्रपटांमधून माहिती मिळतच असते. परंतु आठव्या शतकात एक असा पराक्रमी राजा होऊन गेला ज्याने मोहम्मद बिन कासीम ला तीन युद्धात हरवले आणि कित्येक वर्ष भारतात येण्यापासून रोखून धरले. परंतु या महापराक्रमी राजाची आपण भारतीयांनी म्हणावी तशी दखल घेतली नाही. आपल्या शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात एक ओळ ही या राजाच्या नशिबी आली नाही. राजा चाच यांचे साम्राज्य सहाव्या शतकात सिंधच्या श्रेष्ठ राजा चाचने सिंध, बलोच व पलीकडे इराणचादेखील थोडा भाग आपल्या अखत्यारीत आणला. याचा मुलगा राजा दाहिरच्या काळात मुहम्मद बिन कासीमने सिंधवर आक्रमण केले. या आधी हि त्याने ३ वेळा आक्रमण करून पराभवाची चव चाखली होती. मात्र यावेळी आक्रमण करताना त्याने सोबतीला अनेक छोटे मोठे कबिले आणि बौध्द राजे घेतले होते. त्यामुळे त्याचे सैन्यबळ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले होते. राजा दाहीर साल होते इ.स. ७१२. राजा दाहीरला त्याच्या मंत्र्याने सांगितले, ''तुझ्या कुटुंबीयांना राजस्थामधील हिंदू राजांकडे आश्रयाला पाठव. तू अर...

आद्य शंकराचार्य - हिंदु धर्माचे पुनर्रचनाकार

७ व्या शतकापूर्वी भारतात जैन आणि बौद्ध हे धर्म नव्याने उदयाला आले होते. त्यांना त्यावेळी राजाश्रय ही प्रचंड होता. आणि काळाच्या ओघात आक्रमकांशी लढता लढता हिंदु राजे अतिशय अल्प प्रमाणात राहिले होते. सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात झालेल्या आपसातील लढायांमध्ये हिंदु धर्माला पायदळी तुडवण्याचे अनेक प्रयत्न इतर धर्मीय राजांकडून झाले. त्या जोडीला देशातील शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक असे संप्रदाय वैदिक धर्माला आतून पोखरीत होतेच. या शतकात तांत्रिकांचा उदय झाला आणि तंत्रविद्येच्या नावाखाली अनाचाराचे थैमान चालू झाले. उपासनेच्या नावाखाली सामान्य लोकांची दिशाभूल केली जाऊ लागली. खरा हिंदु धर्म गडप झाला होता. भारतात सर्वत्र धार्मिक अराजक माजले होते. पण म्हणतात ना होणारा प्रत्येक सूर्यास्त त्याच्यासोबत एक नवा सूर्योदय घेऊन येतो. अशा अंधकार माजलेल्या परिस्थितीत आद्य शंकराचार्यांचा जन्म केरळ (मलबार) प्रांतात पूर्णानदीच्या काठी, कालडी ग्रामी इ.स. ७८८ मध्ये एका नंबुद्री ब्राम्हणाच्या कुळात झाला. लहानपणीच वडील गेल्याने त्यांची जोपासना आर्यांबा या त्यांच्या मातेने केली. त्यांच्या वडिलांचे नाव शिवगु...

अघोरी साधु आणि नागा साधु

कुंभमेळा जवळ येताच सर्वात जास्त जर आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे अघोरी साधू आणि नागा साधूंचा... परंतु बऱ्याचदा आपल्याला दोघांमधला फरकच कळून येत नाही. चला तर जाणून घेऊया अघोरी साधु आणि नागा साधुंमधील फरक... अघोरी साधू  अघोरी साधू बनण्यासाठी कुठल्या विशिष्ठ धर्मात जन्म घ्यावा लागत नाही. अगदी जन्माने मुस्लीम असलेला मनुष्य हि अघोरी साधू बनू शकतो. तांत्रिक साधना श्मशानात करतात आणि ज्यांचे शरीर भस्माने लपटलेले असतात ज्यांना सामान्य नागरिक स्वाभाविकपणे घाबरतात. शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही समानार्थी नावे हि आढळतात. या पंथाचे उगमस्थान गुजरातमधील अबू मानले जाते. घोरी-अघोरी-तांत्रिक श्‍मशानाच्या शांततेत जाऊन तंत्र-क्रिया करतात. घोर रहस्यमयी साधना करतात. खरं तर अघोर विद्या घाबरण्यासारखी नसते. त्याच्या स्वरूप भितीदायक असतो. अघोराचा अर्थ आहे "अ+घोर" अर्थात जो घोर नाही आहे, भितीदायक नाही. यूआन च्वांग चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्यकवट्यांच्या माळा व नग्न अशा अवस्थेत हे...

टायटॅनिक आणि हिंदु मानसिकता

टायटॅनिक त्याकाळचे सर्वोत्तम आणि सर्वात मोठे जहाज... कधीच बुडणार नाही अशी ज्याची जाहिरात झाली ते जहाज आपल्या पहिल्याच प्रवासात बुडाले. तेव्हा जवळजवळ तीन जहाजे त्याच्या जवळपास होती. त्यापैकी एक होते "सॅम्पसन" जे टायटॅनिकपासून ७ मैल दूर होते. त्यांनी धोका दर्शविणारा पांढऱ्या उजेडाच्या आकाशात उडवलेल्या दारूगोळ्याना पाहिले पण ते बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते व जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो तर पकडले जावू म्हणून ते मागे वळून टायटॅनिकच्या उलट दिशेने निघून गेले. हे जहाज आपल्यापैकी त्या "स्वार्थी हिंदूंचं" प्रतिनिधित्व करतात जे हिंदू आपल्या स्वत: च्या पापामध्ये इतके व्यस्त आहेत आपला भारत देश बुडत आहे त्याला आपली गरज आहे हे ओळखू शकत नाही ...!  दुसरे जहाज "कॅलिफोर्निया" होते. जे टायटॅनिकपासून फक्त १४ मैलांवरच होते, पण चोहोबाजूंनी हिमनगांनी वेढलेले. त्याच्या कप्तानाने बाहेर बघितले आणि संकटात सापडल्याचा इशारा देणाऱ्या पांढऱ्या फ्लेयर्स पाहिल्या. परंतु परिस्थिती अनुकूल नव्हती आणि अंधारलेली होती म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला व झोपी गेला व क्र...

अंत्यसंस्काराचे प्रकार

आयुष्याचा अखेरचा टप्पा म्हणजे मृत्यू... पण मृत्यू जरी सारखा असला तरी मृत शरीराची विल्हेवाट लावण्याचे निरनिराळे प्रकार आपल्या वेगवेगळ्या संस्कृतीत पाहायला मिळतात. मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्काराच्या पूर्व तयारीपासून मृत देहाच्या विल्हेवाटीचे मुख्यतः सहा प्रकार प्रसिद्ध आहेत. १) मृतदेहास अग्नी देण्याची प्रथा - अगदी प्राचीन काळापासूनच ग्रीक व रोमन समाजात मृतदेहाला अग्नी देण्याची प्रथा होती. हिंदू व बौध्द यांच्यात दहनाची प्रथा आजपर्यंत चालू आहे. दहन झाल्यानंतर ज्या अस्थी राहतात, त्यांना विधिपूर्वक पुरतात किंवा पवित्र नदीत त्यांचे विसर्जन केले जाते. २) मृतदेह जसाच्या तसा टिकविणे - वाळवंटी प्रदेशातल्या जमाती कोरड्या वाळूत खड्डा खणून मृत देहाला ठेवीत. अशा वातावरणात मृतदेह बराच काळ टिकतो. प्राचीन काळी इजिप्तमध्ये राजे व राण्या यांच्या मृतदेहांना टिकवण्याकरिता विशिष्ट प्रकारचे लेप लावून "ममी" तयार करीत असत. त्यांच्या मृतदेहाजवळ त्यांच्या प्रिय वस्तू, हत्यारे, अलंकार व त्यांचा मनुष्यपरिवारही पुरत असत.  ३) मृतदेह व्यवस्थित पुरणे - मृतदेहास स्...

श्रीरामांचा दलित मित्र - राजा निषादराज

दूरदर्शन वर रामायण लागल्यामुळे फुरोगामी लोकांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पना धुळीला मिळवल्या जात आहेत, म्हणुनच कदाचित रामायणाला त्यांचा विरोध असावा. त्यांच्या जातीद्वेषाच्या अजेंड्याला छेद देणारा प्रसंग असा... रामायणातील एका प्रसंगात निषादराज श्रीरामासोबत बसत नाहीत आणि म्हणतात, "मी खालच्या जातीचा आहे. मी श्रीरामासोबत कस बसु...?? तेव्हा महर्षी भारद्वाज ऋषी म्हणतात की, "तुम्ही श्रीरामासोबत शिकला आहात, श्रीरामाचे मित्र आहात. कधी श्रीरामाने उच्च नीचता ठेवली आहे...?? तुम्ही श्रीरामाच्या सोबतच बसा..." निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते एका राज्याचे राजा आहेत म्हणजे दलित राज्य कारभार सुद्धा करु शकत होते ही गोष्ट सिद्ध होते.... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी त्यांनी श्रीरामासोबत शिक्षण घेतलय म्हणजे दलित असो वा कोणी सर्वांना शिक्षण मिळत असे... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते श्रीरामाचे मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिल... आणि खुद्द एका ब्राह्मण ऋषींच्या आश्रमात ते स्वतःहुन खा...