मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

शिवाजी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

छत्रपती शिवराय आणि धर्मांध पोर्तुगीज ख्रिश्चन

ज्यांना वाटत छत्रपती शिवराय "सेक्युलर" होते हे त्यांच्यासाठी...!! महाराज इतर धर्मांचा आदर करत असले तरी हिंदु धर्माचा अनादर त्यांनी कधीच सहन केला नाही. तर गोष्ट आहे १६६३ मधली... तळकोकणात पोर्तुगीजांची मस्ती वाढली होती. स्थानिक हिंदुंचे धर्मांतर करुन त्यांना बाटवण्यात येत होते. हे सर्व समजताच छत्रपती शिवरायांनी तत्काळ तेथील फ्रान्सिस्को तोवेरा याला पत्र लिहून जाब विचारला. मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. स्वत: महाराज व तान्हाजीराव मालुसरे हे ३००० सैन्यानिशी तिथे बारीक लक्ष ठेवून होते. एका रात्री सुमारे ५०० पोर्तुगीज व ४ पाद्री हे हातामधे क्रॉस घेवून धर्मांतर करण्यासाठी मांडवी नदी पार करुन एका वस्तीच्या दिशेने जाताना आढळले. हे पाहताच महाराजांनी ताबडतोब त्यांच्यावर हल्ला केला. ३००० मराठ्यांनी मिळून त्यांना छाटायला सुरवात केली. २००-२५० पोर्तुगीज ठार झाले. हातात क्रॉस घेवुन चालणाऱ्या त्या चारही पाद्रींचे हात दंडापासून तोडले. मराठ्यांचा हा रुद्रावतार पाहून सगळे पोर्तुगीज वाट मिळेल तिथे पळत सुटले. अर्ध्याहून अधिक पोर्तुगीज सैन्याच्या मृतदेहांचा खच तिथे पडला. हात तोडलेल्या त्या लोक...

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....