"नालंदा" हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किमी अंतरावर असून तेथेच विश्वविद्यालयाची वास्तू होती. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विश्वविद्यालयाची स्थापना झाली होती. सम्राट हर्षाच्या काळात हे विश्वविद्यालय भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विश्वविद्यालयाचे नाव "नलविहार" असे होते. नालंदाच्या सुमारे ३५ एकर क्षेत्रात दहा मंदिरे, विविध प्रकारचे बाग बगीचे, वसतिगृह आणि ग्रंथालय होते. नालंदाच्या ग्रंथालयाच्या नाव होते "धर्ममायायोग". धर्ममायायोगमध्ये अनेक इमारती होत्या. त्यातील काही इमारती तर ९ मजल्यापर्यंत उंच होत्या अस म्हटलं जात. या धर्ममायायोगमध्ये शास्त्र, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, कला, वाणिज्य, भाषा यावर सुमारे ९० लाख ग्रंथ पुस्तके असल्याचा अंदाज आहे. नालंदा मध्ये शिक्षण मोफत होत. या विश्वविद्यालयाचा सर्व खर्च सम्राट हर्षवर्धनने दान दिलेल्या शंभर खेड्यांच्या माध्यमातून भागवला जाई. या खेड्यातील लोक विश्वविद्यालयाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू...