मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विजयनगर साम्राज्य

"हंपी" हे मंदिरांच शहर माहिती नसलेला भारतीय आपल्याला क्वचितच सापडेल. तिथल्या मंदिरांचे अवशेष पाहून तत्कालीन वैभव आणि संस्कृतीने आपला उर आपोआप भरून येतो. पण बऱ्याच जणांना माहिती नसेल की "हंपी" हे शहर विजयनगरची राजधानी होती. चला तर आज जाणून घेऊया याच "विजयनगर" साम्रज्याबद्दल... हंपीच्या ४० ते ५० किमी परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा यांचे बरेच अवशेष पाहायला मिळतात. तत्कालीन पोर्तुगीज प्रवासी डॉमीगो प्रेस म्हणतात, "हंपी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेले जगातील सर्वात उत्तम शहर अशी त्याची ख्याती इराक-इराणपर्यंत होती." तर पर्शियन प्रवासी अब्दुल रझाक लिहितो, "माझ्या नेत्रांनी हम्पी इतके अप्रतिम शहर कुठेही पाहिलेले नाही." अनेक टेकडय़ांवर वसलेल्या शहराला एकामागोमाग वर्तुळाकार बांधकाम केलेली सात कोटांची तटबंदी, भर बाजारात दिवसाढवळ्या चांदी, सोने, हिरे, माणके, केशर यांचे ढीगचे ढीग विक्रीसाठी. देशी परदेशी व्यापाऱ्यांच्या झुंडी याने

आचार्य सुश्रुत - प्लास्टिक सर्जरीचे जनक

सुश्रुत ऋषी हे प्राचीन काळातील भारतीय आयुर्वेदाचार्य आणि शल्यतंत्रपारंगत (प्लास्टिक सर्जरी विशेषज्ञ). ते भारतीय शल्यतंत्राचे आद्य प्रणेते मानले जातात. त्यांचा काल व चरित्रात्मक तपशील निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली येथील एन्. एल्. केसवानी ह्यांच्या मते, सुश्रुतांच्या काळाची पूर्वमर्यादा इ. स. पू. ६०० ही होय. सुश्रुत हे दिवोदास काशीराज या धन्वंतरीचे शिष्य होते, असा उल्लेख हेमाद्रिकृत लक्षणप्रकाशा तील अश्वप्रकरणामधील एका श्लोकात आला आहे. यूरोप, अरबस्तान, ग्रीस, कंबोडिया आणि इंडोचायना येथे नवव्या व दहाव्या शतकांत सुश्रुतांचे नाव माहीत झाले होते. अरबस्तानातील वैद्य राझी (इ. स. पू. पहिले शतक) यांनी सुश्रुतांच्या ग्रंथातून शल्यक्रियेचे तंत्र माहीत झाल्याचा उल्लेख त्यांच्या ग्रंथात केला आहे. सुश्रुत संहिता या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या १२० पेक्षा अधिक हत्यारांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात शस्त्रक्रियांचे आठ भागात वर्गीकरण केले गेले आहे.छेदन, भेदन, लेखन, आहरण , व्याधन, इसण, स्रवण,

विक्रमशीला विद्यापीठ

विक्रमशीला विद्यापीठाची स्थापना ८ व्या शतकात पाल साम्राज्याने केली. आज विक्रमशीला विद्यापीठाबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे आणि बऱ्याच लोकांना तर माहिती ही नाही की या नावाचे जागतिक किर्तीचे विद्यापीठ आपल्या भारतात होऊन गेले. नालंदा विद्यापीठाप्रमाणे येथे ही अनेक देशांतून विद्यार्थी अध्ययनासाठी येत असतं. तिबेटी परंपरेनुसार मगधचा पालवंशी राजा धर्मपाल याचा बौद्ध धर्माला राजाश्रय होता आणि त्याने विक्रमशीला विहाराची स्थापना केली. या विहाराची पुढे प्रसिद्धी ‘विक्रमशीला विद्यापीठा’त परिणती झाली. धर्मपालाचे दुसरे नाव विक्रमशील असल्यामुळे या विद्यापीठाचे नाव "विक्रमशीला" ठेवण्यात आले. पाटणा विद्यापीठाच्या प्राचीन इतिहास व संस्कृती या विभागाने १९६० ते ६९ मध्ये बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील अँटिकच येथे उत्खनन केले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्यानेही १९७२-७३ पासून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून विक्रमशीला विद्यापीठाचे अवशेष शोधून काढले. सुमारे १०० एकर परिसरात सापडलेले भव्य मठ, पाषाणाच्या बुद्धप्रतिमा, मोहोरा, स्तूप आणि भव्य जलाशये त्या काळाची ग्वाही देतात. विक्रमशील

तक्षशिला विद्यापीठ

प्राचीन काळापासून भारतात पुष्कळ मोठी विद्यापीठे अस्तित्वात होती. त्यातील तक्षशिला, नालंदा,  विक्रमशिला, काशी, अयोध्या ही विद्यापीठे प्रसिद्ध होती. यांपैकी तक्षशिला विद्यापीठ हे कालक्रमानुसार हे सर्वांत प्राचीन विद्यापीठ आहे. तक्षशिला या शहराचा पहिला उल्लेख आढळतो तो वाल्मिकी रामायणात... प्रभु श्रीरामांचे लहान बंधू म्हणजे राजा भरत यांना दोन पुत्र होते. एकाचे नाव तक्ष आणि दुसऱ्याचे नाव पुष्कल. राजा तक्षचे राज्य आताचे उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या मध्ये पसरले होते. त्यांनी "तक्षशिला" आणि "पुष्करावती" नावाने स्वतःच्या राजधान्या वसवल्या. उझबेकिस्तानची राजधानी असणारे "ताश्कंद" हे शहर "तक्ष" या नावाचा अपभ्रंश होऊन तयार झाले आहे. तक्षशिला शहर तत्कालीन भारतातील "गांधार” देशाची राजधानी होती. सध्याच्या पाकमधील रावळपिंडी शहरापासून पश्चिमेला २० मैलावर वसले होते.  "त्रिपिटक" या बौद्ध धर्माच्या प्रमुख ग्रंथात ही तक्षशिला विश्वविद्यालयाबाबत अनेक उल्लेख आढळतात. अगदी चीन, सीरिया सह ग्रीस मधील ही राजपुत्र येथे शिक्षणासाठी येत असत

नालंदा विश्वविद्यालय

"नालंदा" हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किमी अंतरावर असून तेथेच विश्वविद्यालयाची वास्तू होती. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विश्वविद्यालयाची स्थापना झाली होती. सम्राट हर्षाच्या काळात हे विश्वविद्यालय भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विश्वविद्यालयाचे नाव "नलविहार" असे होते. नालंदाच्या सुमारे ३५ एकर क्षेत्रात दहा मंदिरे, विविध प्रकारचे बाग बगीचे, वसतिगृह आणि ग्रंथालय होते. नालंदाच्या ग्रंथालयाच्या नाव होते "धर्ममायायोग". धर्ममायायोगमध्ये अनेक इमारती होत्या. त्यातील काही इमारती तर ९ मजल्यापर्यंत उंच होत्या अस म्हटलं जात. या धर्ममायायोगमध्ये शास्त्र, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, कला, वाणिज्य, भाषा यावर सुमारे ९० लाख ग्रंथ पुस्तके असल्याचा अंदाज आहे. नालंदा मध्ये शिक्षण मोफत होत. या विश्वविद्यालयाचा सर्व खर्च सम्राट हर्षवर्धनने दान दिलेल्या शंभर खेड्यांच्या माध्यमातून भागवला जाई. या खेड्यातील लोक विश्वविद्यालयाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू

भारताचा रक्षक - राजा पोरस

२३०० वर्षांपूर्वी एक ग्रीक तरुण जग जिंकायला निघालेला ज्याचं नाव "अलेक्झांडर" काहीजण त्याला "सिकंदर" ही म्हणतात... ज्याने त्याच्या हयातीत एक ही युद्धात पराभव पाहिला नाही असा योद्धा आणि त्याच जग जिंकण्याच स्वप्न धुळीस मिळवणारा पराक्रमी राजा पोरस चंद्रवंशी राजा ययातीचा मुलगा पुरूचे वंशज म्हणजे राजा पोरस... राजा पोरसचे खरे नाव पुरुषोत्तम... ग्रीकांनी त्या नावाचा अपभ्रंश करत त्याचे नाव "पोरस" केले. राजा पोरस इसवी सन पूर्व ३४० सत्तेत आले. म्हणजे येशू जन्माला यायच्या ३४० वर्षांपूर्वी बर का... राजा पोरसचे साम्राज्य झेलम नदीपासून चिनाब नदीपर्यंत पसरलेले होते... पोरस सत्तेत आल्यानंतर सुमारे १३ वर्षांनी अलेक्झांडर त्याची ३२००० सैनिकांची सेना घेऊन सिंधू नदी पार करत तक्षशिला येथे येऊन पोहोचला. त्यावेळचा तक्षशिलेचा राजा अंभी हा युद्ध न करता सिकंदरला शरण गेला. तक्षशिला जिंकल्यावर त्याचे लक्ष होते राजा पोरसचे राज्य... आता अलेक्झांडर आणि राजा पोरस या दोघांच्या मध्ये होती ती फक्त झेलम नदी... राजा पोरसने शरणागतीचा प्रस्ताव ठेवावा अशी अलेक्झांडरची अपेक्