मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

चाणक्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सनातन धर्माला नवसंजीवनी देणारा - पुष्यमित्र शुंग

     प्राचीन भारताचा इतिहास इतका समृद्ध आहे कि, प्रत्येक कालखंडात आपल्याला अनेक शूरवीर योद्धे पाहावयास मिळतात. अनेक शूरवीर काळाच्या ओघात विस्मृतीतही गेले. त्यातीलच एक म्हणजे शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती पुष्यमित्र शुंग ....       मौर्य वंशानंतर ख्रि. पू. सु . १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. तत्पूर्वी आचार्य चाणक्य यांच्या निधनानंतर अखंड हिदुस्तानाची त्यांची कल्पना क्षीण झाली होती. चंद्रगुप्त मौर्याने ही जैन धर्माचा स्वीकार केला होता. चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा बिंदुसार गादीवर येताच त्याने राज्याच्या सीमा दक्षिणेपर्यंत वाढवल्या. या पराक्रमी राजाच्या काळात मौर्य साम्राज्याने अनेक राज्ये जिंकून घेतली. त्यानंतर गादीवर बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक आला. पराक्रमी असणाऱ्या सम्राट अशोकाने कलिंगच्या युध्दानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर सुमारे २० वर्ष सम्राट अशोकाने राज्य केले.       ज्या भारतभूमीत जग जिंकायला निघालेला ग्रीकचा अलेक्झांडर ही पराभूत झाला तिथले शूरवीर मौर्य साम्राज्याच्या पराकोटी...

तक्षशिला विद्यापीठ

प्राचीन काळापासून भारतात पुष्कळ मोठी विद्यापीठे अस्तित्वात होती. त्यातील तक्षशिला, नालंदा,  विक्रमशिला, काशी, अयोध्या ही विद्यापीठे प्रसिद्ध होती. यांपैकी तक्षशिला विद्यापीठ हे कालक्रमानुसार हे सर्वांत प्राचीन विद्यापीठ आहे. तक्षशिला या शहराचा पहिला उल्लेख आढळतो तो वाल्मिकी रामायणात... प्रभु श्रीरामांचे लहान बंधू म्हणजे राजा भरत यांना दोन पुत्र होते. एकाचे नाव तक्ष आणि दुसऱ्याचे नाव पुष्कल. राजा तक्षचे राज्य आताचे उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या मध्ये पसरले होते. त्यांनी "तक्षशिला" आणि "पुष्करावती" नावाने स्वतःच्या राजधान्या वसवल्या. उझबेकिस्तानची राजधानी असणारे "ताश्कंद" हे शहर "तक्ष" या नावाचा अपभ्रंश होऊन तयार झाले आहे. तक्षशिला शहर तत्कालीन भारतातील "गांधार” देशाची राजधानी होती. सध्याच्या पाकमधील रावळपिंडी शहरापासून पश्चिमेला २० मैलावर वसले होते.  "त्रिपिटक" या बौद्ध धर्माच्या प्रमुख ग्रंथात ही तक्षशिला विश्वविद्यालयाबाबत अनेक उल्लेख आढळतात. अगदी चीन, सीरिया सह ग्रीस मधील ही राजपुत्र येथे शिक्षणासाठी येत असत...