मुख्य सामग्रीवर वगळा

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई.


चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे.

तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे.

चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे.

स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत. त्यांनी गोवळकोंडा व विजापूर येथील शाहीसत्ता आणि खानदेश व कोकणातील पोर्तुगीज यांच्याकडून चौथाई वसूल केली होती. या चौथाईच्या बदल्यात गोवळकोंडा व विजापूर यांना मोगलांविरुद्ध मदतही केली. 

नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौथाई देणाऱ्या राज्यांवर स्वारी करणार नाही, या अटीवर चौथाई वसूल करू लागले. छत्रपती शिवाजी महाराजाच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज हे ही या पद्धतीप्रमाणे चौथाई वसूल करत असत.

सन १७१९ मध्ये दिल्लीच्या बादशाहने आपल्या दक्षिण भारतातील ६ सुभ्यांवरील चौथाई सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार छत्रपती शाहू महाराजांना दिले होते. मात्र इंग्रजांच्या आगमनानंतर व मराठेशाहीच्या शेवटच्या काळात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावांकडून चौथाई सरदेशमुखीचे सर्व हक्क १८०२ मध्ये काढून घेतले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...

भारताचा रक्षक - राजा पोरस

२३०० वर्षांपूर्वी एक ग्रीक तरुण जग जिंकायला निघालेला ज्याचं नाव "अलेक्झांडर" काहीजण त्याला "सिकंदर" ही म्हणतात... ज्याने त्याच्या हयातीत एक ही युद्धात पराभव पाहिला नाही असा योद्धा आणि त्याच जग जिंकण्याच स्वप्न धुळीस मिळवणारा पराक्रमी राजा पोरस चंद्रवंशी राजा ययातीचा मुलगा पुरूचे वंशज म्हणजे राजा पोरस... राजा पोरसचे खरे नाव पुरुषोत्तम... ग्रीकांनी त्या नावाचा अपभ्रंश करत त्याचे नाव "पोरस" केले. राजा पोरस इसवी सन पूर्व ३४० सत्तेत आले. म्हणजे येशू जन्माला यायच्या ३४० वर्षांपूर्वी बर का... राजा पोरसचे साम्राज्य झेलम नदीपासून चिनाब नदीपर्यंत पसरलेले होते... पोरस सत्तेत आल्यानंतर सुमारे १३ वर्षांनी अलेक्झांडर त्याची ३२००० सैनिकांची सेना घेऊन सिंधू नदी पार करत तक्षशिला येथे येऊन पोहोचला. त्यावेळचा तक्षशिलेचा राजा अंभी हा युद्ध न करता सिकंदरला शरण गेला. तक्षशिला जिंकल्यावर त्याचे लक्ष होते राजा पोरसचे राज्य... आता अलेक्झांडर आणि राजा पोरस या दोघांच्या मध्ये होती ती फक्त झेलम नदी... राजा पोरसने शरणागतीचा प्रस्ताव ठेवावा अशी अलेक्झांडरची अपेक्...

साठमारी डागदारी

नाव ऐकून तुम्हाला ही हा प्रश्न पडला असेल ना? साठमारी डागदारी नक्की काय प्रकार आहे?? तर ही आहेत खेळांची नावे...आपल्या मातीत घडलेल्या देशी मर्दानी खेळांची नावे... पूर्वी राजे महाराजे करमणुकीसाठी विविध खेळांचे आयोजन करत. त्यात मदांध हत्तींशी झुंजायची ही स्पर्धा असायची. या मदांध हत्तींशी झुंजायचा खेळ म्हणजे साठमारी डागदारी .. अठराव्या एकोणिसाव्या शतकात कोल्हापूर आणि बडोद्याच्या संस्थानात हा खेळ अत्यंत लोकप्रिय होता. राज्याच्या भेटीस येणाऱ्या पाहुण्यांसाठी या  साठमारी डागदारी  चे आयोजन केले जात असे. या खेळासाठी खुराक देऊन हत्ती तयार केले जायचे आणि खेळाच्या वेळी त्यांना दारू पाजून व भांगेच्या वड्या खायला घालून मदांध केलं जायचं. हातात कोणतेही शस्त्र न घेता हत्तीशी लढणारे धाडसी मल्ल त्या काळी होऊन गेले. छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी डागदारी  साठी खास प्रशिक्षण देऊन तयार माणसे केली होती. या खेळात मदांध हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येकी २० माणसांचे ३ गट केले जायचे. हे तीन गट मिळून माणसांची संख्या ६० व त्यांच्या हत्यारांची संख्याही ६० होत असल्याने त्यांच्याप...