कुंभमेळा जवळ येताच सर्वात जास्त जर आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे अघोरी साधू आणि नागा साधूंचा... परंतु बऱ्याचदा आपल्याला दोघांमधला फरकच कळून येत नाही. चला तर जाणून घेऊया अघोरी साधु आणि नागा साधुंमधील फरक... अघोरी साधू अघोरी साधू बनण्यासाठी कुठल्या विशिष्ठ धर्मात जन्म घ्यावा लागत नाही. अगदी जन्माने मुस्लीम असलेला मनुष्य हि अघोरी साधू बनू शकतो. तांत्रिक साधना श्मशानात करतात आणि ज्यांचे शरीर भस्माने लपटलेले असतात ज्यांना सामान्य नागरिक स्वाभाविकपणे घाबरतात. शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही समानार्थी नावे हि आढळतात. या पंथाचे उगमस्थान गुजरातमधील अबू मानले जाते. घोरी-अघोरी-तांत्रिक श्मशानाच्या शांततेत जाऊन तंत्र-क्रिया करतात. घोर रहस्यमयी साधना करतात. खरं तर अघोर विद्या घाबरण्यासारखी नसते. त्याच्या स्वरूप भितीदायक असतो. अघोराचा अर्थ आहे "अ+घोर" अर्थात जो घोर नाही आहे, भितीदायक नाही. यूआन च्वांग चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्यकवट्यांच्या माळा व नग्न अशा अवस्थेत हे...