मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खाद्य तेलांच्या किंमती का वाढत आहेत?

गरमागरम भज्यांना कुरकुरीतपणा आणणारे अमृत म्हणजे #खाद्यतेल .. पण गेल्या ६ महिन्यात याच खाद्यतेलांच्या किंमती ४० ते ५० % वाढल्या आहेत. परंतु अनेकांना याच कारणच माहिती नसल्याने ते सवयीप्रमाणे केंद्र सरकारला दोषी धरत आहेत. याविषयावर सर्वांनाच माहिती व्हावी म्हणूनच हा लेखन प्रपंच ~ जानेवारी २०२१ ची आकडेवारी पाहिली तर जून २०२० पासून खाद्यतेलांच्या किंमती जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढलेल्या आपल्याला दिसून येतील. यातील १५ टक्के वाढ एकट्या जानेवारी महिन्यात झाली आहे. Solvent Extractor's Association of India चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी जानेवारी मध्ये सांगितलेलं की, या वाढलेल्या किमती एप्रिल मे अखेरपर्यंत राहतील आणि त्यानंतर हळू हळू कमी होतील. किंमती का वाढल्या? आपल्या देशात पाम, सोयाबीन आणि सूर्यफुल या ३ तेलांचा सर्वाधिक वापर होतो. पाम तेल - जगाला पाम तेलाचा जवळपास ८०% पुरवठा मलेशिया व इंडोनेशियातर्फे केला जातो. मलेशियाने कश्मीरबाबत पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारत मलेशिया संबंध बरेच ताणले गेले होते. त्यावेळी आपण पाम तेल आयात करायचं बंद केलं होत. मात्र २०२० मध्ये पुन्हा आयात करण्य