मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

history लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सनातन धर्माला नवसंजीवनी देणारा - पुष्यमित्र शुंग

     प्राचीन भारताचा इतिहास इतका समृद्ध आहे कि, प्रत्येक कालखंडात आपल्याला अनेक शूरवीर योद्धे पाहावयास मिळतात. अनेक शूरवीर काळाच्या ओघात विस्मृतीतही गेले. त्यातीलच एक म्हणजे शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती पुष्यमित्र शुंग ....       मौर्य वंशानंतर ख्रि. पू. सु . १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. तत्पूर्वी आचार्य चाणक्य यांच्या निधनानंतर अखंड हिदुस्तानाची त्यांची कल्पना क्षीण झाली होती. चंद्रगुप्त मौर्याने ही जैन धर्माचा स्वीकार केला होता. चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा बिंदुसार गादीवर येताच त्याने राज्याच्या सीमा दक्षिणेपर्यंत वाढवल्या. या पराक्रमी राजाच्या काळात मौर्य साम्राज्याने अनेक राज्ये जिंकून घेतली. त्यानंतर गादीवर बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक आला. पराक्रमी असणाऱ्या सम्राट अशोकाने कलिंगच्या युध्दानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर सुमारे २० वर्ष सम्राट अशोकाने राज्य केले.       ज्या भारतभूमीत जग जिंकायला निघालेला ग्रीकचा अलेक्झांडर ही पराभूत झाला तिथले शूरवीर मौर्य साम्राज्याच्या पराकोटी...

प्रभु श्रीरामांशी संबंधित दुर्लक्षित स्थाने

आपण रामायण लहानपणापासून ऐकत आलो आहोत परंतु रामायणातील बरीचशी ठिकाणे आपण ऐकलेली तर असतात परंतु पाहिलेली नसतात. आज रामनवमीच्या निमित्ताने या दुर्लक्षित ठिकाणांची चित्ररूपी सफर करूया...!! गंधमादन पर्वत - तिबेट मधील हिमालय पर्वत रांगेत गंधमादन पर्वत आहे. इथे हनुमान आज ही निवास करतात अस मानल जात. इथूनच रावणाशी युद्धाची तयारी केली असल्याच म्हटलं जात. आणि भीमाच गर्वहरण ही याच पर्वतावर झाल होत. या पर्वतावर एक मंदिर आहे जिथे प्रभू श्रीराम यांच्या पावलांचे ठसे आहेत.त्याचप्रमाणे रामेश्वर मध्ये हि एक गंधमादन पर्वत आहे जिथून हनुमानाने लंकेत जाण्यासाठी उड्डाण केलेलं. किष्किंधा, कर्नाटक - हम्पी पासून जवळच आसपास वसलेल्या भागात सुग्रीवच राज्य होत. पूर्वीच्या काळात दंडकारण्यात हा भाग यायचा. येथे वानरराज वाली व सुग्रीव यांची राजधानी होती. कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीकाठच्या हंपीजवळचे आधुनिक अनेगुंदी गाव म्हणजेच प्राचीन काळची किष्किंधा नगरी असे म्हणतात. अनेगुंदीपासून थोड्या अंतरावर आग्नेयीकडे तुंगभद्रेच्या काठी वालीप्रासाद व सप्ततालवेधस्थान दाखविले जाते. या स्थळापलीकडील गुंफेमध्ये रामा...

नालंदा विश्वविद्यालय

"नालंदा" हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किमी अंतरावर असून तेथेच विश्वविद्यालयाची वास्तू होती. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विश्वविद्यालयाची स्थापना झाली होती. सम्राट हर्षाच्या काळात हे विश्वविद्यालय भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विश्वविद्यालयाचे नाव "नलविहार" असे होते. नालंदाच्या सुमारे ३५ एकर क्षेत्रात दहा मंदिरे, विविध प्रकारचे बाग बगीचे, वसतिगृह आणि ग्रंथालय होते. नालंदाच्या ग्रंथालयाच्या नाव होते "धर्ममायायोग". धर्ममायायोगमध्ये अनेक इमारती होत्या. त्यातील काही इमारती तर ९ मजल्यापर्यंत उंच होत्या अस म्हटलं जात. या धर्ममायायोगमध्ये शास्त्र, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, कला, वाणिज्य, भाषा यावर सुमारे ९० लाख ग्रंथ पुस्तके असल्याचा अंदाज आहे. नालंदा मध्ये शिक्षण मोफत होत. या विश्वविद्यालयाचा सर्व खर्च सम्राट हर्षवर्धनने दान दिलेल्या शंभर खेड्यांच्या माध्यमातून भागवला जाई. या खेड्यातील लोक विश्वविद्यालयाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू...