मुख्य सामग्रीवर वगळा

प्रभु श्रीरामांशी संबंधित दुर्लक्षित स्थाने

आपण रामायण लहानपणापासून ऐकत आलो आहोत परंतु रामायणातील बरीचशी ठिकाणे आपण ऐकलेली तर असतात परंतु पाहिलेली नसतात. आज रामनवमीच्या निमित्ताने या दुर्लक्षित ठिकाणांची चित्ररूपी सफर करूया...!!

  • गंधमादन पर्वत - तिबेट मधील हिमालय पर्वत रांगेत गंधमादन पर्वत आहे. इथे हनुमान आज ही निवास करतात अस मानल जात. इथूनच रावणाशी युद्धाची तयारी केली असल्याच म्हटलं जात. आणि भीमाच गर्वहरण ही याच पर्वतावर झाल होत. या पर्वतावर एक मंदिर आहे जिथे प्रभू श्रीराम यांच्या पावलांचे ठसे आहेत.त्याचप्रमाणे रामेश्वर मध्ये हि एक गंधमादन पर्वत आहे जिथून हनुमानाने लंकेत जाण्यासाठी उड्डाण केलेलं.


  • किष्किंधा, कर्नाटक - हम्पी पासून जवळच आसपास वसलेल्या भागात सुग्रीवच राज्य होत. पूर्वीच्या काळात दंडकारण्यात हा भाग यायचा. येथे वानरराज वाली व सुग्रीव यांची राजधानी होती. कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीकाठच्या हंपीजवळचे आधुनिक अनेगुंदी गाव म्हणजेच प्राचीन काळची किष्किंधा नगरी असे म्हणतात. अनेगुंदीपासून थोड्या अंतरावर आग्नेयीकडे तुंगभद्रेच्या काठी वालीप्रासाद व सप्ततालवेधस्थान दाखविले जाते. या स्थळापलीकडील गुंफेमध्ये रामाने वालीवधानंतर विश्रांती घेतली होती. नदीच्या पलीकडील तीरावर वालीवधाचे स्थान असून, तेथील श्वेतशिला वालीच्या अस्थी म्हणून दाखवितात, तर त्याजवळच्या पर्वत शिखरांना तारा, अंगद व सुग्रीव यांच्या नावांनी संबोधतात.


  • कोथंड रामास्वामी मंदिर, रामेश्वरम - अस म्हटलं जात कि रावणाला हरवल्यावर प्रभू श्रीमांनी बिभीषणाचा राज्याभिषेक इथेच केलेला. बिभीशनाचे भारतातील एकमेव मंदिर इथेच आहे. ज्या दगडांनी रामसेतू बनवला गेला त्याच दगडाने निर्मित एक शिवलिंग शेजारीच आहे जे पूर्णत समुद्रात आहे आणि जे कधीच पाण्याखाली बुडत नाही.


  • दिविरुम्पोला, श्रीलंका - सीतामातेने ज्या ठिकाणी अग्नीप्रवेश केला, त्या स्थानावरील अश्‍वत्थ वृक्ष आणि मंदिर. श्रीलंकेतील मध्य प्रांतातील अतीउंच पर्वतीय भागात हे स्थान आहे.


  • गुरुलूपोथा, श्रीलंका - येथे रावणाची पत्नी मंदोदरी हिच्या महालाच्या अवशेषांची छायाचित्रे ! सीतामातेचे रावणाने अपहरण करून तिला याच महालात ठेवले होते.


  • अशोक वाटिका, श्रीलंका - ‘सीतामातेच्या शोधात आलेल्या रामभक्त हनुमानाने या दगडावरून ज्या अशोक वृक्षाखाली सीतामाता बसली होती, त्या वृक्षावर झेप घेतली’, असे म्हणतात. दगडावर त्याचे पाऊल उमटले आहे.


  • शरयू नदी, अयोध्या - प्रभु श्रीराम आणि त्यांच्या प्रजेने अयोध्येतील याच शरयू नदीत जलसमाधी घेतली होती.


  • अयोध्या - भारताचा राजा, रावणाचा नाश करून श्रीलंका जिंकणाऱ्या अवतारी प्रभु श्रीराम यांच्या अयोध्येतील सध्याच्या स्थानाची स्थिती


संदर्भ :
  • सनातन संस्था
  • दैनिक भास्कर
  • विकिपीडिया

टिप्पण्या

  1. एक छान सफर घडवलीत 👍

    अयोध्येत लवकरच एक भव्य मंदिर अस्तित्वात येतेय , ते झाल्यावर शेवटचा डोळ्यात खुपणारा फोटो तुम्ही बदलालच :)

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या कडे ज्ञान भांडार प्रचंड आहे. तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल.

    उत्तर द्याहटवा
  3. माहित नसलेली माहिती सर्वांना उपलब्ध करून दिली... 👍👍

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरियाची भारतीय महाराणी

हजारो वर्षापूर्वी घडलेल्या रामायणाचा, प्रभू श्री रामांचा इतिहास आपणा सर्वाना माहितच आहे, पण आज आपण अयोध्येच्या इतिहासातील एका दुर्लक्षित अध्यायाकडे पाहूया...!! सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. ज्या वंशात राणी सुरीरत्ना यांचा विवाह झाला त्याला दक्षिण कोरियात "करक वंश" या नावाने ओळ्खल जात. या करक वंशाकडे दक्षिण आणि उत्तर कोरियातील बऱ्याच भूभागाची खूप वर्ष सत्ता होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील "किम" आडनावाची लोक करक वंशातील आहेत अस मानल जात. "किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात. राण...

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

अंत्यसंस्काराचे प्रकार

आयुष्याचा अखेरचा टप्पा म्हणजे मृत्यू... पण मृत्यू जरी सारखा असला तरी मृत शरीराची विल्हेवाट लावण्याचे निरनिराळे प्रकार आपल्या वेगवेगळ्या संस्कृतीत पाहायला मिळतात. मृत्यू झाल्यावर अंत्यसंस्काराच्या पूर्व तयारीपासून मृत देहाच्या विल्हेवाटीचे मुख्यतः सहा प्रकार प्रसिद्ध आहेत. १) मृतदेहास अग्नी देण्याची प्रथा - अगदी प्राचीन काळापासूनच ग्रीक व रोमन समाजात मृतदेहाला अग्नी देण्याची प्रथा होती. हिंदू व बौध्द यांच्यात दहनाची प्रथा आजपर्यंत चालू आहे. दहन झाल्यानंतर ज्या अस्थी राहतात, त्यांना विधिपूर्वक पुरतात किंवा पवित्र नदीत त्यांचे विसर्जन केले जाते. २) मृतदेह जसाच्या तसा टिकविणे - वाळवंटी प्रदेशातल्या जमाती कोरड्या वाळूत खड्डा खणून मृत देहाला ठेवीत. अशा वातावरणात मृतदेह बराच काळ टिकतो. प्राचीन काळी इजिप्तमध्ये राजे व राण्या यांच्या मृतदेहांना टिकवण्याकरिता विशिष्ट प्रकारचे लेप लावून "ममी" तयार करीत असत. त्यांच्या मृतदेहाजवळ त्यांच्या प्रिय वस्तू, हत्यारे, अलंकार व त्यांचा मनुष्यपरिवारही पुरत असत.  ३) मृतदेह व्यवस्थित पुरणे - मृतदेहास स्...