मुख्य सामग्रीवर वगळा

सिंध मधील शेवटचा हिंदु राजा - राजा दाहीर

भारतात अनेक थोर पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले. आपल्याला सातत्याने त्यांच्याबद्दल ग्रंथ, पुस्तके आणि चित्रपटांमधून माहिती मिळतच असते. परंतु आठव्या शतकात एक असा पराक्रमी राजा होऊन गेला ज्याने मोहम्मद बिन कासीम ला तीन युद्धात हरवले आणि कित्येक वर्ष भारतात येण्यापासून रोखून धरले. परंतु या महापराक्रमी राजाची आपण भारतीयांनी म्हणावी तशी दखल घेतली नाही. आपल्या शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात एक ओळ ही या राजाच्या नशिबी आली नाही.

राजा चाच यांचे साम्राज्य

सहाव्या शतकात सिंधच्या श्रेष्ठ राजा चाचने सिंध, बलोच व पलीकडे इराणचादेखील थोडा भाग आपल्या अखत्यारीत आणला. याचा मुलगा राजा दाहिरच्या काळात मुहम्मद बिन कासीमने सिंधवर आक्रमण केले. या आधी हि त्याने ३ वेळा आक्रमण करून पराभवाची चव चाखली होती. मात्र यावेळी आक्रमण करताना त्याने सोबतीला अनेक छोटे मोठे कबिले आणि बौध्द राजे घेतले होते. त्यामुळे त्याचे सैन्यबळ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले होते.

राजा दाहीर

साल होते इ.स. ७१२. राजा दाहीरला त्याच्या मंत्र्याने सांगितले, ''तुझ्या कुटुंबीयांना राजस्थामधील हिंदू राजांकडे आश्रयाला पाठव. तू अरबांशी लढत असल्यामुळे राजस्थानला, गुजरातला संरक्षण मिळत आहे, ते निश्चित मदत करतील.'' पण राजाने नकार दिला. तो म्हणाला, ''मी माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पाठवले, तर माझ्या सरदारांना कोणत्या तोंडाने लढण्यास सांगू? या युध्दात जर मी जिंकलो, तर आपले राज्य महासत्ता होईल! आणि जर हरलो तर शौर्याने लढलो म्हणून माझे नाव अरब व हिंदच्या गाथांमधून अमर होईल!''

सिंधू नदीच्या काठी दाहीर व कासीमचे घनघोर युध्द झाले. राजा दाहीर व त्याचा पुत्र जयसिंह धारातीर्थी पडले. कासीमने राजाचे धडावेगळे केलेले शीर व त्याच्या मुली - सूर्यादेवी व प्रेमलदेवी "नजराणा" म्हणून खलिफाला पाठवल्या.

राजा दाहिरच्या मुलींनी युक्तीने कासिमवर सूड उगवला. त्यांनी खलीफास सांगितले की "कासीमने त्यांचा उपभोग घेतला असल्याने त्या खलिफासाठी लायक नाहीत!" या वक्तव्याने संतापलेल्या खलिफाने कासिमला मृत्युदंड ठोठावला. कासीमच्या मृत्युनंतर खलिफाला त्याची चूक लक्षात आली. तेव्हा त्याने राजा दाहिरच्या दोन बहाद्दर मुलींना भिंतीत चिणून मारले.

राजा दाहीर व त्याच्या पुत्राच्या शौर्याच्या व त्याच्या मुलींनी घेतलेल्या सुडाची कथा अरबांनी लिहिलेल्या 'चाचनामा'मध्ये आहे. पण हिंदच्या एकाही लेखात, गाथेत किंवा पोवाडयातसुध्दा त्यांचे नाव नाही. त्या राजाने, त्याच्या कुटुंबाने आणि त्याच्या हजारो सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची हिंदुस्तानात ही कोणीही दखल घेतली नाही.

मोहम्मद बिन कासीम ने राजा दाहीरच्या कुटुंबाला मारलं पण राजा दाहीरने संरक्षण दिलेल्या मोहम्मद पैगंबरांच्या परिवारातील लोकांची ही हत्या केली. परंतु दुर्दैव अस आहे कि धर्माधर्मात वाद लावणारे काही मुल्ला मौलवी पैगंबरांच्या वंशजांचे रक्षण करणाऱ्या राजा दाहीरच्या वंशजांना काफिर म्हणून संबोधत आहेत. आणि मोहम्मद पैगंबरांच्या परिवाराची निर्घुण हत्या करणारा मोहम्मद बिन कासीम त्यांच्यासाठी मसीहा आहे.

आता प्रश्न आहे माझ्या भारतातील मुस्लीम बांधवांना आहे, कि तुमचा हिरो कोण आहे? मोहम्मद बिन कासीम का राजा दाहीर??

संदर्भ - 


  • साप्ताहिक विवेक
  • पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ
  • worldhistorymaps.info


टिप्पण्या

  1. आपल्या पुर्वजानी राज्य विस्तार करताना क्रूर व्हायला पाहिजे होतं आपल्या लोकांना झालेला त्रास वाचु, ऐकू वाटत नाही

    उत्तर द्याहटवा
  2. वाचताना हताश व्हायला होते, आपला चांगुलपणाच आपल्या नाशाला कारणीभूत झालाय हेच या सर्व इतिहासातून प्रतिबिंबित होतं.
    राजा दाहिर आणि त्याच्या कुटूंबियांना आपल्या इतिहासातील त्यांचे योग्य स्थान मिळायलाच हवे 🙏
    तुम्हाला धन्यवाद या लेखाबद्दल 👍🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...

10 good habits that world should learn from INDIA

Here are 10 good habits that world should learn from INDIA to avoid epidemics like Corona. 1) Say YES to Namaste & NO to shake hands. Reason - As study shows viruses like bacterias can be transferred from one to another by shaking hands. Namaste is safest way to greet people. 2) Drinking water from bottles without allowing lips to touch the mouth of bottle. Reason - It reduces probability of transmission of inectious agents through saliva. 3) Practise of taking shower after attending the funeral. Reason - The dead oerson may have some infectious disease which can be transmitted so it makes sense. 4) Washing hands before eating. Reason - Your hands are touching everywhere so bacterias on your hands may cause you illness. Washing your hands before eating can rinse away most of the bacteria. 5) Removing shoes outside the main gate of house. Reason - Shoes have large number of bacteria on bottom of the shoes. So it makes sense ...

सनातन धर्माला नवसंजीवनी देणारा - पुष्यमित्र शुंग

     प्राचीन भारताचा इतिहास इतका समृद्ध आहे कि, प्रत्येक कालखंडात आपल्याला अनेक शूरवीर योद्धे पाहावयास मिळतात. अनेक शूरवीर काळाच्या ओघात विस्मृतीतही गेले. त्यातीलच एक म्हणजे शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती पुष्यमित्र शुंग ....       मौर्य वंशानंतर ख्रि. पू. सु . १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. तत्पूर्वी आचार्य चाणक्य यांच्या निधनानंतर अखंड हिदुस्तानाची त्यांची कल्पना क्षीण झाली होती. चंद्रगुप्त मौर्याने ही जैन धर्माचा स्वीकार केला होता. चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा बिंदुसार गादीवर येताच त्याने राज्याच्या सीमा दक्षिणेपर्यंत वाढवल्या. या पराक्रमी राजाच्या काळात मौर्य साम्राज्याने अनेक राज्ये जिंकून घेतली. त्यानंतर गादीवर बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक आला. पराक्रमी असणाऱ्या सम्राट अशोकाने कलिंगच्या युध्दानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर सुमारे २० वर्ष सम्राट अशोकाने राज्य केले.       ज्या भारतभूमीत जग जिंकायला निघालेला ग्रीकचा अलेक्झांडर ही पराभूत झाला तिथले शूरवीर मौर्य साम्राज्याच्या पराकोटी...