शेवटच्या मौर्य राजांच्या कारकीर्दीत मगध राज्याचा विस्तार होण्याऐवजी संकोच झाला होता पण सेनापती पुष्यमित्राने सूत्रे हातात घेताच आपली सत्ता दूरवर पसरविली. मध्य भारतातील विदिशा येथे त्याचा पुत्र अग्निमित्र प्रांताधिपती म्हणून राज्य करत होता. पुष्यमित्राच्या सहाव्या वंशजाचा लेख अयोध्येस सापडला आहे. दिव्यावदान ग्रंथावरून त्याचा अंमल पंजाबात जालंधर आणि सियालकोट पर्यंत पसरला असल्याचे दिसून येते.
सेनापती पुष्यमित्राने २ अश्वमेघ यज्ञ केल्याचा उल्लेख अयोध्येच्या लेखात आहे. मात्र तरीही त्याने आपली ‘सेनापती’ ही पदवी बदलली नाही. संत कालिदासांचे मालविकाग्निमित्र नाटक तत्कालीन घटनांवर आधारलेले आहे. त्यातही पुष्यमित्राचा उल्लेख सेनापती पुष्यमित्र असाच केल्याचा आपल्याला आढळून येतो. तत्कालीन पुराव्यांच्या आधारे त्याने ३६ वर्ष शासन केल्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो.
पुष्यमित्राच्या कालखंडात वैदिक धर्म आणि संस्कृत भाषेला नवसंजीवनी मिळाली. त्याने अशोकाचे हिंसाविरोधी निर्बंध बदलून वैदिक यज्ञ यागास परवानगी दिली आणि स्वतःही अश्वमेघा सारखे यज्ञ केले. पतंजलीच्या महाभाष्य "इदं पुष्यमित्रं याजयामः|: असे उदाहरण आले आहे. त्यावरून त्याच्या यज्ञांत पतंजलीने स्वतः ऋत्विजाचे काम केले होते, असा अनुमान काढता येतो.
पुष्यमित्राने बौद्धांचा छळ केला, असाही एक मतप्रवाह आहे. पुष्यमित्राने पाटलीपुत्रातील कुक्कुटाराम नामक बौद्ध विहार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, अनेक बौद्ध विहार उद्ध्वस्त करून बौद्ध भिक्षूंची कत्तल केली होती. तर काही बौद्धांनी ग्रीकांना छुपी मदत केली म्हणून पुष्यमित्राने बौद्धांना दंडीत केल्याचं ही आपणास ऐकावया मिळते. मात्र या दंतकथांना समकालीन पुरावे आजमितीस उपलब्ध नाहीत.
मात्र काही डाव्या सेक्युलर लोकांनी पुष्यमित्र ला खलनायक दाखवायचा प्रयत्न केला. कोणत्याही सबळ पुराव्यांअभावी त्याला कट्टर सनातनी दाखवत, बौद्ध धर्मद्वेषी असल्याचे दाखवले गेले.
सांची स्तूप, मध्यप्रदेश |
मात्र भारहुत आणि सांची येथील तत्कालीन बांधलेल्या स्तूप आपल्याला वेगळीच कहाणी सांगतात. भारहुत येथील तोरणावर तर ":सुंगानं रजे|" म्हणजेच शुंगांच्या राज्यात असा स्पष्ट उल्लेख आहे. याचाच अर्थ पुष्यमित्र स्वधर्माभिमानी असला तरी इतर धर्मांचा द्वेष करत नव्हता असाच होतो.
संदर्भ : The Age of Imperial Unity, OpIndia
Thanks for such informative article.. concise and articulate..🙏
उत्तर द्याहटवाउत्तम
उत्तर द्याहटवाखरोखर चांगली माहिती आपण दिलीत धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवाछान माहिती आहे. हे माहिती नव्हते. धन्यवाद🙏🙏
उत्तर द्याहटवामस्त, आता तुमचे सगळेच blogs वाचणार आहे मी ��
उत्तर द्याहटवा