मुख्य सामग्रीवर वगळा

कोरियाची भारतीय महाराणी

हजारो वर्षापूर्वी घडलेल्या रामायणाचा, प्रभू श्री रामांचा इतिहास आपणा सर्वाना माहितच आहे, पण आज आपण अयोध्येच्या इतिहासातील एका दुर्लक्षित अध्यायाकडे पाहूया...!!

सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला.


ज्या वंशात राणी सुरीरत्ना यांचा विवाह झाला त्याला दक्षिण कोरियात "करक वंश" या नावाने ओळ्खल जात. या करक वंशाकडे दक्षिण आणि उत्तर कोरियातील बऱ्याच भूभागाची खूप वर्ष सत्ता होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील "किम" आडनावाची लोक करक वंशातील आहेत अस मानल जात.

"किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या
समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात.

राणी सुरीरत्ना यांची समाधी

दक्षिण कोरियातील अनेक लोक स्वत:ला राणी सुरीरत्नाचे वंशज मानतात. सुमारे ६० लाख करक वंशीय आजही दक्षिण कोरिया मध्ये राहतात. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती Kim Dae-Jung आणि माजी प्रधानमंत्री KimJong-Pil हे सुद्धा स्वताला करक वंशीय मानतात. दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोरियन नागरिक अयोध्येस भेट देतात आणि आपल्या २००० वर्षापूर्वीच्या राजमातेच स्मरण करून त्यांना आदरांजली वाहतात.

कोरियन राष्ट्रपती मून जे इन यांच्या पत्नी किम जुंग सुक यांची अयोध्या भेट

प्राचीन काळी दक्षिण आशियात भारतीय संस्कृतीचा खूप प्रभाव होता. इंडोनेशिया, म्यानमार, मलेशिया, थायलंड, नेपाळ या सारख्या अनेक देशात आजही प्रभू श्रीराम पुजले जातात. बऱ्याच देशात आता हिंदू अल्पसंख्यांक असले तरी ते देश हिंदुत्वाशी असलेली नाळ जोडून आहेत. त्यांची राष्ट्रीय प्रतिक, स्मारक यामधून आपल्याला ते सातत्याने दिसून येत.

मात्र जिथे दक्षिण आशियातून विविध देशाचे लोक आवर्जून भेटायला येतात त्या अयोध्येत प्रभू श्री रामांच साध मंदिर ही नाही. आजही प्रभू श्री राम एका तंबूत विराजमान आहेत हे निश्चितच भूषणावह नाही. अशा परिस्थितीत प्रभू श्रीरामांना पाहिल्यावर जे परदेशी नागरिक अयोध्येस भेट देण्यास येतात त्यांच्या मनात भारताबद्दल काय प्रतिमा तयार होत असेल? कोर्टाच्या आदेशानुषर अयोध्येत आता राम मंदिर निर्माण होणार असल तरी त्याबरोबरच अयोध्येस धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास दक्षिण आशियातील देशांसोबत सौदार्हपूर्ण संबंध वाढवण्यास ते निश्चितच पूरक ठरेल आणि भारत-दक्षिण कोरियाच्या नात्यात एक नवा अध्याय जोडला जाईल.

संदर्भ :

  • edtimes
  • livehistoryindia.com
  • swarajyamag.in
  • indiatoday.in


टिप्पण्या

  1. मस्त माहिती अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आजच्या पिढीला माहीत नाहीयेत धन्यवाद आपण माहिती करून देतात

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद सर मी ही आजच्या पिढीचाच एक तरुण आहे, आपला गौरवपूर्ण इतिहास आपल्या शिक्षण पद्धतीमुळे आपल्यासमोर येतंच नाही, हा इतिहास सर्वांसमोर यावा यासाठीच मी हा ब्लॉग चालू केला आहे...

      हटवा
  2. माझ्यासाठी नवीन आणि महत्वपूर्ण माहिती, धन्यवाद 🚩🙏

    उत्तर द्याहटवा
  3. रामायणाला एक कपोलकल्पित कथा म्हणणाऱ्यांना ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत.
    लवकरच निर्माण होणारे राममंदिर या आपल्या पाहुण्यांचे थाटात स्वागत करेल.

    धन्यवाद अशी छान माहिती देत आहात त्याबद्दल 🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...

श्रीरामांचा दलित मित्र - राजा निषादराज

दूरदर्शन वर रामायण लागल्यामुळे फुरोगामी लोकांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पना धुळीला मिळवल्या जात आहेत, म्हणुनच कदाचित रामायणाला त्यांचा विरोध असावा. त्यांच्या जातीद्वेषाच्या अजेंड्याला छेद देणारा प्रसंग असा... रामायणातील एका प्रसंगात निषादराज श्रीरामासोबत बसत नाहीत आणि म्हणतात, "मी खालच्या जातीचा आहे. मी श्रीरामासोबत कस बसु...?? तेव्हा महर्षी भारद्वाज ऋषी म्हणतात की, "तुम्ही श्रीरामासोबत शिकला आहात, श्रीरामाचे मित्र आहात. कधी श्रीरामाने उच्च नीचता ठेवली आहे...?? तुम्ही श्रीरामाच्या सोबतच बसा..." निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते एका राज्याचे राजा आहेत म्हणजे दलित राज्य कारभार सुद्धा करु शकत होते ही गोष्ट सिद्ध होते.... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी त्यांनी श्रीरामासोबत शिक्षण घेतलय म्हणजे दलित असो वा कोणी सर्वांना शिक्षण मिळत असे... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते श्रीरामाचे मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिल... आणि खुद्द एका ब्राह्मण ऋषींच्या आश्रमात ते स्वतःहुन खा...