मुख्य सामग्रीवर वगळा

अघोरी साधु आणि नागा साधु

कुंभमेळा जवळ येताच सर्वात जास्त जर आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे अघोरी साधू आणि नागा साधूंचा...

परंतु बऱ्याचदा आपल्याला दोघांमधला फरकच कळून येत नाही. चला तर जाणून घेऊया अघोरी साधु आणि नागा साधुंमधील फरक...

अघोरी साधू 



अघोरी साधू बनण्यासाठी कुठल्या विशिष्ठ धर्मात जन्म घ्यावा लागत नाही. अगदी जन्माने मुस्लीम असलेला मनुष्य हि अघोरी साधू बनू शकतो.

तांत्रिक साधना श्मशानात करतात आणि ज्यांचे शरीर भस्माने लपटलेले असतात ज्यांना सामान्य नागरिक स्वाभाविकपणे घाबरतात.

शैव संप्रदायातील एक पंथ. त्याला ‘अघोर’, ‘औघड’, ‘औदर’, ‘सरभंग’ व ‘अवधूत’ अशीही समानार्थी नावे हि आढळतात. या पंथाचे उगमस्थान गुजरातमधील अबू मानले जाते.

घोरी-अघोरी-तांत्रिक श्‍मशानाच्या शांततेत जाऊन तंत्र-क्रिया करतात. घोर रहस्यमयी साधना करतात. खरं तर अघोर विद्या घाबरण्यासारखी नसते. त्याच्या स्वरूप भितीदायक असतो. अघोराचा अर्थ आहे "अ+घोर" अर्थात जो घोर नाही आहे, भितीदायक नाही.

यूआन च्वांग चिनी प्रवाशाने ह्या पंथियांचे वर्णन केलेले आहे. अंगाला राख फासलेली, गळ्यात मनुष्यकवट्यांच्या माळा व नग्न अशा अवस्थेत हे लोक राहत. काही लोक झाडांच्या साली किंवा पाने, तर काही व्याघ्रचर्म नेसत. चामुंडा ही त्यांची देवता असून ते प्रेताचे मांसही ते खात.

असे मानले जाते की अघोरी मनुष्याच्या मासांचे देखील सेवन करतात. असे करण्यामागे हाच तर्क असतो की व्यक्तीच्या मनातून घृणा निघून जायला पाहिजे. ज्याला समाज घृणा करतो अघोरी ते अंगी लावतात. लोक श्मशान, मृत शरीर यांस घृणा करतात पण अघोर यांना अंगी लावतात.

अघोर पंथाचे प्रणेता महादेव आहे मानले जाते. म्हटले जाते की महादेवाने स्वयं अघोर पंथाचे निर्माण केले होते. देव दत्तात्रेयाला देखील अघोरशास्त्राचे गुरू म्हटले जाते. दत्तात्रेयाला महादेवाचा अवतार मानला जातो.

चितेच्या भस्माचे शरीरावर लेप आणि चिताग्निवर स्वयंपाक तयार करणे इत्यादी सामान्य कार्य असतात. अघोर जागेचे भेद करत नाही अर्थात महाल किंवा श्मशान घाट यांच्यासाठी एक सारखे असतात.

नागा साधू



फक्त हिंदू धर्मात जन्म घेतलेला व्यक्तीच नागा साधू बनू शकतो.

अघोरी साधू जसे मानवी कवटी आणि हाडांची आभूषणे परिधान करतात त्या उलट नागा साधू रुद्राक्षांच्या माळा परिधान करतात.

त्यांचे आश्रम हरिद्वार आणि इतर तीर्थक्षेत्रांच्या दुर्गम भागात आहेत जिथे ते सामान्य जीवनापासून दूर कठोर शिस्तीत राहतात. त्यांच्या रागाबद्दलच्या लोकप्रिय कथा देखील गर्दी त्यांच्यापासून दूर ठेवतात. पण वास्तविकता अशी आहे की हे फारच क्वचितच कोणालाही इजा पोहोचवतात.

नागा साधू हे लष्करी पंथ असून त्यांचेकडील त्रिशूल, तलवार, शंख आणि चिलम यांच्या सैनिकी स्थितीचे प्रतिनिधित्व करतात.

हे भिक्षु जास्त करून कुंभमेळ्यात दिसतात. कपडे न घातल्यामुळे, आकाश हेच ज्यांचे कपडे आहेत असे समजून अनेक शिवभक्त त्यांनादिगंबरही म्हणतात. कपड्यांच्या नावाखाली संपूर्ण शरीरावर धूमाची राख लपेटलेले हे साधू केवळ शाही स्नानाच्या वेळी कुंभमेळ्यात भाविकांसमोर उघडपणे येतात. सहसा ते माध्यमांपासून आपले अंतर ठेवतात.

बहुतेक नागा भिक्षु पुरुष आहेत, काही स्त्रिया नागा भिक्षु देखील आहेत, परंतु ते सर्वसाधारणपणे सार्वजनिकपणे नग्न राहत नाहीत.

आदि शंकराचार्य

आदिगुरु शंकराचार्य , भारतीय सनातन धर्माच्या सद्यस्थितीचा पायाठेवले होते शंकराचा जन्म इ.स.पू. ५ व्या शतकात झाला होता जेव्हा भारतीय लोकांची स्थिती व दिशा अधिक चांगली नव्हती.

भारताच्या संपत्तीवरुन खेचलेले सर्व आक्रमक येथे येत होते. काहींनी तो खजिना आपल्याकडे परत घेतला, काही जण इथल्या स्थायिक झालेल्या भारताच्या दिव्य स्वरात इतके मोहित झाले की सर्वसाधारण शांतता विस्कळीत झाली. देव, धर्म, धर्मशास्त्र यांना तर्क, शस्त्रे आणि शास्त्र या सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, सनातन धर्म स्थापनेसाठी शंकराचार्यांनी बरीच पावले उचलली.

तरुण ऋषींनी व्यायामाद्वारे त्यांचे शरीर मजबूत केले पाहिजे आणि शस्त्रे चालवण्याचे कौशल्य देखील आत्मसात केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

पुढे अनेक आखाडे अस्तित्त्वात आली. शंकराचार्य यांनी आखाड्यांना मठ, मंदिरे आणि भाविकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यास शक्तीचा वापर करण्याची सूचना केली.

परकीय आक्रमणानंतर स्थानिक राजा-महाराज अनेक वेळा नागा योद्धा साधूंचा आधार घेत असत. अशा अनेक गौरवशाली युद्धांचे इतिहासात वर्णन केले आहे ज्यात ७० हजाराहून अधिक नागा योद्ध्यांनी भाग घेतला होता. अहमद शाह अब्दालीच्या मथुरा-वृंदावन नंतर गोकुळच्या हल्ल्याच्या वेळी नागा साधूंनी लढा दिला होता.

संदर्भ -


  • Indictoday.com
  • विकिपीडिया
  • webduniya.com
  • मराठी विश्वकोश

टिप्पण्या

  1. शंकराचार्य यांच्या बद्दल काही माहिती मिळाली तर बरे होईल

    उत्तर द्याहटवा
  2. लेख थोडा विस्कळित वाटतो, माहितीही त्रोटक आहे.
    अजून विस्तृत लेख लिहिता येईल का?

    उत्तर द्याहटवा
  3. Check "haribhakt Naga sadhu" in Google. It gives most detailed description of Naga sadhus. Your article inspires to Google and got that site. So sharing with all.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...

श्रीरामांचा दलित मित्र - राजा निषादराज

दूरदर्शन वर रामायण लागल्यामुळे फुरोगामी लोकांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पना धुळीला मिळवल्या जात आहेत, म्हणुनच कदाचित रामायणाला त्यांचा विरोध असावा. त्यांच्या जातीद्वेषाच्या अजेंड्याला छेद देणारा प्रसंग असा... रामायणातील एका प्रसंगात निषादराज श्रीरामासोबत बसत नाहीत आणि म्हणतात, "मी खालच्या जातीचा आहे. मी श्रीरामासोबत कस बसु...?? तेव्हा महर्षी भारद्वाज ऋषी म्हणतात की, "तुम्ही श्रीरामासोबत शिकला आहात, श्रीरामाचे मित्र आहात. कधी श्रीरामाने उच्च नीचता ठेवली आहे...?? तुम्ही श्रीरामाच्या सोबतच बसा..." निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते एका राज्याचे राजा आहेत म्हणजे दलित राज्य कारभार सुद्धा करु शकत होते ही गोष्ट सिद्ध होते.... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी त्यांनी श्रीरामासोबत शिक्षण घेतलय म्हणजे दलित असो वा कोणी सर्वांना शिक्षण मिळत असे... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते श्रीरामाचे मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिल... आणि खुद्द एका ब्राह्मण ऋषींच्या आश्रमात ते स्वतःहुन खा...