७ व्या शतकापूर्वी भारतात जैन आणि बौद्ध हे धर्म नव्याने उदयाला आले होते. त्यांना त्यावेळी राजाश्रय ही प्रचंड होता. आणि काळाच्या ओघात आक्रमकांशी लढता लढता हिंदु राजे अतिशय अल्प प्रमाणात राहिले होते. सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात झालेल्या आपसातील लढायांमध्ये हिंदु धर्माला पायदळी तुडवण्याचे अनेक प्रयत्न इतर धर्मीय राजांकडून झाले.
त्या जोडीला देशातील शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक असे संप्रदाय वैदिक धर्माला आतून पोखरीत होतेच. या शतकात तांत्रिकांचा उदय झाला आणि तंत्रविद्येच्या नावाखाली अनाचाराचे थैमान चालू झाले. उपासनेच्या नावाखाली सामान्य लोकांची दिशाभूल केली जाऊ लागली. खरा हिंदु धर्म गडप झाला होता. भारतात सर्वत्र धार्मिक अराजक माजले होते.
पण म्हणतात ना होणारा प्रत्येक सूर्यास्त त्याच्यासोबत एक नवा सूर्योदय घेऊन येतो. अशा अंधकार माजलेल्या परिस्थितीत आद्य शंकराचार्यांचा जन्म केरळ (मलबार) प्रांतात पूर्णानदीच्या काठी, कालडी ग्रामी इ.स. ७८८ मध्ये एका नंबुद्री ब्राम्हणाच्या कुळात झाला. लहानपणीच वडील गेल्याने त्यांची जोपासना आर्यांबा या त्यांच्या मातेने केली. त्यांच्या वडिलांचे नाव शिवगुरू होते. अध्ययन व अध्यापन यांची एक उज्ज्वल परंपरा त्या घराण्यात चालत आलेली होती.
श्रीशंकराचार्यांनी आठव्या वर्षी सर्व वेदांचे अध्ययन पूर्ण केले. आईकडून संन्यास घेण्याबद्दल परवानगी मिळवून ते घराबाहेर पडले. विंध्याद्रीच्या आसपास त्यांची गोविंद पूज्यपादाचार्य यांच्याशी गाठ पडली. त्यांनी उपदेश करून शंकराचार्यांना संन्यासदीक्षा दिली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी सर्व शास्त्रात प्रावीण्य प्राप्त केले. नंतर ते काशीला गेले. तेथे त्यांनी पंडितांशी वाद करून त्यांना आपल्या विद्वत्तेने प्रभावित केले; त्यांना वादात जिंकले, त्यामुळे त्यांची महती, कीर्ती वाढली.
शंकराचार्यांनी स्वतःच्या तेजस्वी बुद्धीमतेच्या जोरावर हिंदु धर्मावरचे आघात परतवून लावले, धर्मातल्या विकृती दूर केल्या, शैव वैष्णव वाद दूर केला, काळाच्या प्रभावाने धर्मावर वाढलेली जळमटे दूर केली. कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून, त्यांनी हिंदू धर्माची पुनःस्थापना केली.
मोठमोठ्या नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांसह भारतभ्रमण केले अन् त्यांना हिंदु तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ (ओडिसा), शृंगेरी पीठ (दक्षिण देश), शारदापीठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (हिमालय) अशा भारताच्या चार दिशांना चार पिठांची स्थापना करून तेथे त्यांच्या चार शिष्यांना तिथे पिठाधिपती म्हणून नेमले.
श्रीशंकराचार्यांनी उपनिषदे, गीता व वेदांतसूत्रे या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिले आणि आपला अद्वैत वेदांताचा सिद्धांत प्रस्थापित केला. तेच शांकरभाष्य. अद्वैत म्हणजे जीव, शिव (ईश्वर) ही दोन नव्हेत, एकच आहेत; आणि ब्रम्ह हे चराचर सृष्टी व्यापून राहिले आहे. या भाष्यामुळे जुन्या वैदिक संस्कृतीची परंपरा पुनरुज्जीवित होऊन तिचे भारतीय जीवनातील स्थान अखंड राहिले.
प्रस्थानत्रयीवरील भाष्यांखेरीज आचार्यांच्या नावावर सुमारे चारशे स्फुटग्रंथ असल्याचे हस्तलिखितांच्या समग्र याद्यांवरून दिसून येते.
त्याकाळी भारताच्या संपत्तीवरुन खेचलेले सर्व आक्रमक येथे येत होते. काहींनी तो खजिना लुटला. काही जण इथल्या स्थायिक झालेल्या भारताच्या दिव्य स्वरात इतके मोहित झाले की सर्वसाधारण शांतता विस्कळीत झाली. देव, धर्म, धर्मशास्त्र यांना तर्क, शस्त्रे आणि शास्त्र या सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, सनातन धर्म स्थापनेसाठी शंकराचार्यांनी बरीच पावले उचलली.
तरुण ऋषींनी व्यायामाद्वारे त्यांचे शरीर मजबूत केले पाहिजे आणि शस्त्रे चालवण्याचे कौशल्य देखील आत्मसात केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. पुढे अनेक आखाडे अस्तित्त्वात आली. शंकराचार्य यांनी आखाड्यांना मठ, मंदिरे आणि भाविकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यास शक्तीचा वापर करण्याची सूचना केली.
आपण अनेक पिढ्या खर्ची घातल्या तरी पुरे पडावयाचे नाही, इतके प्रचंड कार्य आचार्यांनी आपल्या अवघ्या बत्तीस वर्षाच्या आयुष्यात साधले. परंतु या हिंदु धर्माची पुनर्रचना करणाऱ्या या थोर ज्ञानी महापुरुषाबद्दल आपणास जास्त माहिती ना कधी शिकवली गेली ना ती कधी पोहोचवली गेली. किमान उपलब्ध माहिती तरी आपण आपल्या कुटुंबात, मित्र परिवारात आणि येणाऱ्या पिढीस सामाईक करू शकलो तरी ती शंकराचार्यांना आपली आदरांजली ठरेल.

संदर्भ -
- हिंदु जनजागृती समिती
- सनातन संस्था
- मराठी विश्वकोश
- अद्वैत वेदांत

धन्यवाद इतकी सुंदर आणि अभ्यासपूर्ण माहिती पोहोचवल्या बद्दल.
उत्तर द्याहटवाविनंतीला मान देऊन बहुमोल माहिती दिली. त्याबद्दल मनापासून आभार. 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा