मुख्य सामग्रीवर वगळा

टायटॅनिक आणि हिंदु मानसिकता

टायटॅनिक त्याकाळचे सर्वोत्तम आणि सर्वात मोठे जहाज... कधीच बुडणार नाही अशी ज्याची जाहिरात झाली ते जहाज आपल्या पहिल्याच प्रवासात बुडाले. तेव्हा जवळजवळ तीन जहाजे त्याच्या जवळपास होती.


  • त्यापैकी एक होते "सॅम्पसन" जे टायटॅनिकपासून ७ मैल दूर होते. त्यांनी धोका दर्शविणारा पांढऱ्या उजेडाच्या आकाशात उडवलेल्या दारूगोळ्याना पाहिले पण ते बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते व जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो तर पकडले जावू म्हणून ते मागे वळून टायटॅनिकच्या उलट दिशेने निघून गेले.
हे जहाज आपल्यापैकी त्या "स्वार्थी हिंदूंचं" प्रतिनिधित्व करतात जे हिंदू आपल्या स्वत: च्या पापामध्ये इतके व्यस्त आहेत आपला भारत देश बुडत आहे त्याला आपली गरज आहे हे ओळखू शकत नाही ...! 

  • दुसरे जहाज "कॅलिफोर्निया" होते. जे टायटॅनिकपासून फक्त १४ मैलांवरच होते, पण चोहोबाजूंनी हिमनगांनी वेढलेले. त्याच्या कप्तानाने बाहेर बघितले आणि संकटात सापडल्याचा इशारा देणाऱ्या पांढऱ्या फ्लेयर्स पाहिल्या. परंतु परिस्थिती अनुकूल नव्हती आणि अंधारलेली होती म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला व झोपी गेला व क्रू नी स्वत: ला असे समजावण्याचा प्रयत्न केला की काहीही झाले नाही.... 
हे जहाज आपल्यातील त्या "निद्रिस्त हिंदूंचं" प्रतिनिधीत्व करतात जे आता काही करू शकत नाही परिस्थिती योग्य नाहीत आणि त्यामुळे कोणाला मदत करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल होईपर्यंत ते प्रतीक्षा करतात. 

  • शेवटचे जहाज होते "कार्पाथिया" होता. टायटॅनिकपासून ५८ मैल दूर दक्षिणेकडील दिशेने धावणारी हे जहाज...
त्यांनी रेडिओवर टायटँनिकवरील हलकल्लोळ, रडणे,मदतीचा आक्रोश ऐकला. या जहाजाचा कप्तानाने ईश्वरचरणी प्रार्थना करत पुर्ण वेगाने जहाज चालू केले आणि सभोवतालच्या पसरलेल्या हिमनगातून मार्ग काढत हे जहाज टायटॅनिक जवळ पोहोचले व हेच ते जहाज होते ज्याने टायटॅनिक वरील ७०५ जणांना वाचवले.
हे जहाज आपल्यातील त्या "प्रखर हिंदूंचं" प्रतिनिधीत्व करतात जे आपल सर्वस्व पणाला लावून या भारत भूमीला सर्व संकटातून वाचवत पूनर्वैभवास नेऊ इच्छित आहे.


या "कार्पाथिया" हिंदूंना आपणास सहकार्य करणे जमत नसेल तर किमान विरोध तरी करू नये, हीच अपेक्षा...!!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...

श्रीरामांचा दलित मित्र - राजा निषादराज

दूरदर्शन वर रामायण लागल्यामुळे फुरोगामी लोकांनी पसरवलेल्या चुकीच्या कल्पना धुळीला मिळवल्या जात आहेत, म्हणुनच कदाचित रामायणाला त्यांचा विरोध असावा. त्यांच्या जातीद्वेषाच्या अजेंड्याला छेद देणारा प्रसंग असा... रामायणातील एका प्रसंगात निषादराज श्रीरामासोबत बसत नाहीत आणि म्हणतात, "मी खालच्या जातीचा आहे. मी श्रीरामासोबत कस बसु...?? तेव्हा महर्षी भारद्वाज ऋषी म्हणतात की, "तुम्ही श्रीरामासोबत शिकला आहात, श्रीरामाचे मित्र आहात. कधी श्रीरामाने उच्च नीचता ठेवली आहे...?? तुम्ही श्रीरामाच्या सोबतच बसा..." निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते एका राज्याचे राजा आहेत म्हणजे दलित राज्य कारभार सुद्धा करु शकत होते ही गोष्ट सिद्ध होते.... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी त्यांनी श्रीरामासोबत शिक्षण घेतलय म्हणजे दलित असो वा कोणी सर्वांना शिक्षण मिळत असे... निषादराज स्वतः म्हणतात, ते खालच्या जातीचे आहेत तरी ते श्रीरामाचे मित्र आहेत आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिल... आणि खुद्द एका ब्राह्मण ऋषींच्या आश्रमात ते स्वतःहुन खा...