मुख्य सामग्रीवर वगळा

खाद्य तेलांच्या किंमती का वाढत आहेत?

गरमागरम भज्यांना कुरकुरीतपणा आणणारे अमृत म्हणजे #खाद्यतेल..

पण गेल्या ६ महिन्यात याच खाद्यतेलांच्या किंमती ४० ते ५० % वाढल्या आहेत. परंतु अनेकांना याच कारणच माहिती नसल्याने ते सवयीप्रमाणे केंद्र सरकारला दोषी धरत आहेत. याविषयावर सर्वांनाच माहिती व्हावी म्हणूनच हा लेखन प्रपंच ~

जानेवारी २०२१ ची आकडेवारी पाहिली तर जून २०२० पासून खाद्यतेलांच्या किंमती जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढलेल्या आपल्याला दिसून येतील. यातील १५ टक्के वाढ एकट्या जानेवारी महिन्यात झाली आहे.

Solvent Extractor's Association of India चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी जानेवारी मध्ये सांगितलेलं की, या वाढलेल्या किमती एप्रिल मे अखेरपर्यंत राहतील आणि त्यानंतर हळू हळू कमी होतील.
Money bag किंमती का वाढल्या?
आपल्या देशात पाम, सोयाबीन आणि सूर्यफुल या ३ तेलांचा सर्वाधिक वापर होतो.

Rightwards arrow पाम तेल -
जगाला पाम तेलाचा जवळपास ८०% पुरवठा मलेशिया व इंडोनेशियातर्फे केला जातो. मलेशियाने कश्मीरबाबत पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर भारत मलेशिया संबंध बरेच ताणले गेले होते. त्यावेळी आपण पाम तेल आयात करायचं बंद केलं होत. मात्र २०२० मध्ये पुन्हा आयात करण्यास सुरुवात केली. मात्र कोरोनामुळे तिथले ही पाम तेलाचे उत्पादन कमी झाले आहे.
चीन कोरोनातुन सावरत असल्याने चीनची तेलाची मागणी देखील वाढली आहे. गेल्या सहा महिन्यात चीनने पाम तेलाची आयात ३१% वाढवली आहे. जानेवारी २०२० च्या तुलनेत जानेवारी २१ मध्ये चीनचे खाद्यतेलाची मागणी ४८% वाढली आहे. उत्पादन कमी असताना चीनने आयात वाढवल्याने त्याचा प्रभाव तेलाच्या किंमतीवरही पडला.


Rightwards arrow सोयाबीन तेल -
जगभरात ब्राझील आणि अर्जेंटिना हे दोन प्रमुख देश आहेत जे सोयाबीनचे प्रमुख उत्पादक आहेत. मात्र तिथल्या दुष्काळामुळे आणि कोरोनामुळे गेल्या १० वर्षात सोयाबीनचे सर्वात कमी उत्पादन आले.


 
Rightwards arrow सूर्यफुल तेल -
रशिया आणि युक्रेन सूर्यफुलाच्या बियांचे मुख्य निर्यातदार आहेत. भारतही यांच्याकडूनच खरेदी करत असतो. मात्र या दोन्ही देशात मिळून सूर्य फुलाच्या बियांचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जवळपास ३० लाख टन कमी झाले आहे. ज्यामुळे यांच्या किंमती ही वाढल्या.

भारत जवळपास सुमारे ६५% तेल इतर देशांमधून आयात करतो. त्यामुळे जगाच्या पाठीवर घडलेल्या गोष्टींचा प्रभाव भारतावर पडणे निश्चित आहे. भारतात खूप आधीपासून खाद्य तेलांवर आयात कर वसूल गेला जातो. पाम तेलावर तो ३७.५% होता. नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने त्यात १० टक्के कपात करून २७.५% केला.

मात्र ज्या देशांमधून आपण आयात करतो तिथे किंमत वाढल्याने हा आपल्याला हा बदल दिसून नाही आला. याव्यतिरिक्त पाम तेलावर १७.५% तर सोयाबीन आणि सूर्यफुल तेलावर २०% कृषी सेस आकारला जातो. मात्र सरकार हा कृषी सेस देखील कमी करण्याच्या विचारात आहे. येत्या महिनाभरात सरकारने आयात केलेलं खाद्यतेल बाजारात येईल, तेव्हा तेलाच्या किंमती निश्चितच कमी होतील.

माहिती नसताना उगाच केंद्र सरकारला दोष देण्यापेक्षा आधी माहिती घेत चला...

क्यूँ की पढेगा इंडिया, तभी तो आगे बढेगा इंडिया...!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरियाची भारतीय महाराणी

हजारो वर्षापूर्वी घडलेल्या रामायणाचा, प्रभू श्री रामांचा इतिहास आपणा सर्वाना माहितच आहे, पण आज आपण अयोध्येच्या इतिहासातील एका दुर्लक्षित अध्यायाकडे पाहूया...!! सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. ज्या वंशात राणी सुरीरत्ना यांचा विवाह झाला त्याला दक्षिण कोरियात "करक वंश" या नावाने ओळ्खल जात. या करक वंशाकडे दक्षिण आणि उत्तर कोरियातील बऱ्याच भूभागाची खूप वर्ष सत्ता होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील "किम" आडनावाची लोक करक वंशातील आहेत अस मानल जात. "किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात. राण...

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...