सुश्रुत ऋषी हे प्राचीन काळातील भारतीय आयुर्वेदाचार्य आणि शल्यतंत्रपारंगत (प्लास्टिक सर्जरी विशेषज्ञ). ते भारतीय शल्यतंत्राचे आद्य प्रणेते मानले जातात. त्यांचा काल व चरित्रात्मक तपशील निश्चितपणे सांगता येत नाही.
परंतु भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली येथील एन्. एल्. केसवानी ह्यांच्या मते, सुश्रुतांच्या काळाची पूर्वमर्यादा इ. स. पू. ६०० ही होय. सुश्रुत हे दिवोदास काशीराज या धन्वंतरीचे शिष्य होते, असा उल्लेख हेमाद्रिकृत लक्षणप्रकाशा तील अश्वप्रकरणामधील एका श्लोकात आला आहे. यूरोप, अरबस्तान, ग्रीस, कंबोडिया आणि इंडोचायना येथे नवव्या व दहाव्या शतकांत सुश्रुतांचे नाव माहीत झाले होते. अरबस्तानातील वैद्य राझी (इ. स. पू. पहिले शतक) यांनी सुश्रुतांच्या ग्रंथातून शल्यक्रियेचे तंत्र माहीत झाल्याचा उल्लेख त्यांच्या ग्रंथात केला आहे.
सुश्रुत संहिता या आपल्या ग्रंथात त्यांनी तीनशेहून अधिक शस्त्रक्रियेच्या पद्धती आणि शस्त्रक्रियेकरिता लागणाऱ्या १२० पेक्षा अधिक हत्यारांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात शस्त्रक्रियांचे आठ भागात वर्गीकरण केले गेले आहे.छेदन, भेदन, लेखन, आहरण , व्याधन, इसण, स्रवण, शिवण या त्या आठ क्रिया होत.
आयुर्वेदानुसार शरीरात तीन दोष आहेत. त्यांना वात, पित्त व कफ अशा संज्ञा आहेत. सुश्रुताचार्यांनी ‘रक्त’ हा चौथा दोष मानला आहे. त्यानंतर सुमारे २००० वर्षांनी १९०१ मध्ये कार्ल लँडस्टेनर ने रक्तगटाचा शोध लावला. यावरून आपल्याला लक्षात येईल की आपली संस्कृती किती पुढे होती.
सुश्रुत यांना त्वचारोपण तंत्र, मोतीबिंदू काढणे इ. शस्त्रक्रियांची माहिती होती. प्रसूती योग्य मार्गाने होत नसल्यास मूल बाहेर काढण्याचे उपाय त्यांनी सांगितले आहेत. असाध्य वाटणाऱ्या व्याधीही रसायन चिकित्सेने बऱ्या होऊ शकतात असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या सुश्रुतसंहिता ग्रंथात बालरोगविज्ञानावर ‘कौमारभृत्य’ हे प्रकरण लिहिले आहे. त्यांनी स्थूलता व मधुमेह यांच्या संबंधातील तसेच हा विकार पुढील पिढ्यांमध्ये बीजाद्वारे (आनुवंशिकतेने) प्रेषित होत असल्याचा उल्लेख केला आहे.
गंगा नदीच्या काठी जिथे आजचे वाराणसी शहर वसले आहे त्याच परिसरात सुश्रुतांनी आपल्या विद्येचा अभ्यास तसेच प्रसार केला. शल्यक्रियेमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे सुश्रुत शल्यक्रियेचे पितामह म्हणून ओळखले जातात.
विविध प्रकारचे गोळे(ट्यूमर), शरीरांतर्गत झालेली किंवा बाहेरुन झालेले इजा, अस्थिभंग व गर्भारपण/ बाळंतपणातील त्रास व त्याचेसाठीची शल्यक्रिया, आतड्याची शल्यक्रिया आदी शस्त्रक्रिया सुश्रुतांनी विकसित केल्या. त्यांना कॉस्मेटिक सर्जरीचे जनक समजले जाते.
जेंव्हा औषोधोपचाराने रोगी ठिक होत नाही तेंव्हा काही रोगात शल्यक्रिया आवश्यक असते असे त्यांचे म्हणणे होते. मूळव्याध, स्तनरोग सारख्या व्याधींमध्ये कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियांचे वर्णन त्यांनी त्यांच्या सुश्रुत संहिता या ग्रंथात केले आहे.
शस्त्रक्रियेआधी काय तयारी करावयास हवी, इतर प्रक्रिया, शरीरातील मर्मे सुंगणी शल्यक्रियेनंतर करावयाचे उपचार याचीपण माहिती या ग्रंथात आहे. ते शस्त्रक्रियेनंतर जखम शिवण्यास रेशिम, गुळवेल किंवा अस्मांतक वृक्षाचा धागा वापरत. त्यांनी हजारो वर्षाआधी शल्यक्रियेचा पाया घातला.
इसवी सनापूर्वी आणि त्यानंतर कित्येक शतके भारतामध्ये सुश्रुत यांची शल्यविद्या प्रमाण मानली जात होती. बौद्घ काळातही सुश्रुत यांचे वैद्यक मूलभूत मानीत.
परंतु जसे जसे आपल्या देशावर आपल्या संस्कृतीवर इंग्रज आक्रमण होत गेलं, आपण आपला इतिहास, आपली बुध्दी, आपल ज्ञान सगळं हरवून बसलो.
संदर्भ -

- तरुण भारत, नागपूर
- वैदिक संस्कृतीचा विकास - लक्ष्मण शास्त्री
- भिषकरत्न, के. के. सुश्रुत संहिता

खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती.
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌👌👏👏👏👏
उत्तर द्याहटवा