२३०० वर्षांपूर्वी एक ग्रीक तरुण जग जिंकायला निघालेला ज्याचं नाव "अलेक्झांडर" काहीजण त्याला "सिकंदर" ही म्हणतात...
ज्याने त्याच्या हयातीत एक ही युद्धात पराभव पाहिला नाही असा योद्धा आणि त्याच जग जिंकण्याच स्वप्न धुळीस मिळवणारा पराक्रमी राजा पोरस
चंद्रवंशी राजा ययातीचा मुलगा पुरूचे वंशज म्हणजे राजा पोरस...
राजा पोरसचे खरे नाव पुरुषोत्तम...
ग्रीकांनी त्या नावाचा अपभ्रंश करत त्याचे नाव "पोरस" केले.
राजा पोरस इसवी सन पूर्व ३४० सत्तेत आले.
म्हणजे येशू जन्माला यायच्या ३४० वर्षांपूर्वी बर का...
राजा पोरसचे साम्राज्य झेलम नदीपासून चिनाब नदीपर्यंत पसरलेले होते...
पोरस सत्तेत आल्यानंतर सुमारे १३ वर्षांनी अलेक्झांडर त्याची ३२००० सैनिकांची सेना घेऊन सिंधू नदी पार करत तक्षशिला येथे येऊन पोहोचला.
त्यावेळचा तक्षशिलेचा राजा अंभी हा युद्ध न करता सिकंदरला शरण गेला.
तक्षशिला जिंकल्यावर त्याचे लक्ष होते राजा पोरसचे राज्य... आता अलेक्झांडर आणि राजा पोरस या दोघांच्या मध्ये होती ती फक्त झेलम नदी...
राजा पोरसने शरणागतीचा प्रस्ताव ठेवावा अशी अलेक्झांडरची अपेक्षा होती परंतु राजा पोरसने युद्ध पुकारले.
राजा पोरसकडे ३०००० पायदळ ४००० घोडेस्वार ३०० रथ आणि एक अशी गोष्ट होती जी अलेक्झांडरलाही माहिती नव्हती..ते म्हणजे लढाऊ हत्ती... या हत्तींसमोर आलेली प्रत्येक गोष्ट उध्वस्त करायचे.
राजा पोरस आणि अलेक्झांडरमध्ये झालेलं युद्ध भारतात झेलमची लढाई आणि ग्रीक भाषेत "Battle of Hydaspes" नावाने परिचित आहे.
ग्रीक इतिहासकार लिहितात की, युद्ध ८ तास चालले. युद्धाच्या आदल्या रात्री पावसाने सगळं युद्धाचं मैदान ओलसर झाल्याने पोरसचे रथ त्यात अडकून बसले. पोरसच्या सैन्य हतबल झाले तरी पोरस लढत होता. पोरसला या युद्धात हार मानावी लागली.
राजा पोरसला लढताना पाहून अलेक्झांडर खूप प्रभावित झाला असं तत्कालीन ग्रीक इतिहासकार अरायान लिहितात. ते पुढे असाही लिहितात की अलेक्झांडर राजा पोरसला विचारतो की, "मी तुझ्याशी कसं वागू?" तेव्हा राजा पोरस म्हणतो "तसच जसं एखाद्या राजाशी वागतात" हे उत्तर ऐकून अलेक्झांडर पोरसला त्याच राज्य परत द्यायचं ठरवतो.. हा झाला ग्रीकांनी लिहिलेला इतिहास जो चुकीचा आहे...
याला मुख्यतः दोन कारणे आहेत -
कारण क्र. १)
स्वतःच्या बापाला आणि भावाला ठार करणारा अलेक्झांडर जिंकला असता तर त्याने राजा पोरसला त्याच राज्य परत दिलं असत?
कारण क्र. २)
आणि सगळं जग जिंका यचं स्वप्न घेऊन भारतात आलेला अलेक्झांडर युद्ध जिंकल्यावर परत फिरेल अस वाटत?
नाही ना...याच उत्तर ग्रीक इतिहासकार ही देऊ शकत नाहीत त्यामुळे युद्ध अलेक्झांडरने नव्हे तर पोरस राजाने जिंकल्याची शक्यताच जास्त वाटते..
ग्रीकांनी त्यांचा खोटा इतिहास लिहत सिकंदर आजही जिवंत ठेवला आणि आम्ही मात्र जिंकलेल्या वीर योध्याला ही विस्मृतीत घालवलं...

संदर्भ -
- कॉम्प्रीहेन्सीव हिस्टरी ऑफ इंडिया - ए.एन.शास्त्री
- चंद्रगुप्त मौर्य - पुरुषोत्तम भार्गव
- "India in the Age of the Nandas" - K. A. Nilakanta Sastri

Nice bro
उत्तर द्याहटवाधन्यवाद...!!
हटवाVery informative sir...thx for sharing the knowledge.
उत्तर द्याहटवाThank you so much...!!
हटवाधन्यवाद आणि अभिनंदन ब्लॉग सुरू केल्याबद्दल 💐
उत्तर द्याहटवाट्विटरवर तुझे सर्व लेख वाचायला मिळालेच होते, पण इथे सलग वाचताना जास्त चांगले वाटते.
तुझं लिखाण सरळ, सोपं आणि भाषा ओघवती आहे.
विषयाबद्दल उत्सुकता निर्माण होते.
असंच वाचायला मिळत राहील ही अपेक्षा.
शुभेच्छा 💐
नक्कीच...ट्विटर वरील बऱ्याच जणांचा आग्रह होता ब्लॉग सुरू करावा म्हणून...आई जगदंबेच्या कृपेने आपल्या प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन..!!
हटवाखूपच सुंदर sir बरा वाटला खरं इतिहास आमच्या समोर आणलं , या बद्दल आपला खूप आभारी आहे, माझ्या मुलांना पण हे सांगेन
हटवाआपला ऐतिहासिक ठेवा इतका व्यापक आहे की तो लिहायला एक जन्म पुरणार नाही परंतु होईल तितके जास्त विषय सोप्या भाषेत मी इथे मांडायचा प्रयत्न करेल. आपल्याला माझे प्रयत्न आवडल्याबद्दल मी आभारी आहे आपला..!!
हटवालिखाणात खंड पडू नये. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले लिखाण पोहचावे असे काही करता येईल का
उत्तर द्याहटवाझाकोळलेल्या इतिहासाचे पुनःर्जीवन पुस्तक रूपात मांडणे शक्य आहे का
उत्तर द्याहटवा