मुख्य सामग्रीवर वगळा

तक्षशिला विद्यापीठ

प्राचीन काळापासून भारतात पुष्कळ मोठी विद्यापीठे अस्तित्वात होती. त्यातील तक्षशिला, नालंदा,  विक्रमशिला, काशी, अयोध्या ही विद्यापीठे प्रसिद्ध होती. यांपैकी तक्षशिला विद्यापीठ हे कालक्रमानुसार हे सर्वांत प्राचीन विद्यापीठ आहे.


तक्षशिला या शहराचा पहिला उल्लेख आढळतो तो वाल्मिकी रामायणात...
प्रभु श्रीरामांचे लहान बंधू म्हणजे राजा भरत यांना दोन पुत्र होते. एकाचे नाव तक्ष आणि दुसऱ्याचे नाव पुष्कल.
राजा तक्षचे राज्य आताचे उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या मध्ये पसरले होते. त्यांनी "तक्षशिला" आणि "पुष्करावती" नावाने स्वतःच्या राजधान्या वसवल्या.

उझबेकिस्तानची राजधानी असणारे "ताश्कंद" हे शहर "तक्ष" या नावाचा अपभ्रंश होऊन तयार झाले आहे. तक्षशिला शहर तत्कालीन भारतातील "गांधार” देशाची राजधानी होती. सध्याच्या पाकमधील रावळपिंडी शहरापासून पश्चिमेला २० मैलावर वसले होते. 

"त्रिपिटक" या बौद्ध धर्माच्या प्रमुख ग्रंथात ही तक्षशिला विश्वविद्यालयाबाबत अनेक उल्लेख आढळतात. अगदी चीन, सीरिया सह ग्रीस मधील ही राजपुत्र येथे शिक्षणासाठी येत असतं. असं म्हटलं जात की तिथे शिस्त अतिशय कडक होती, इतकी कडक की राजपुत्रांना ही कडक शिक्षा दिली जायची. 

तक्षशिलेच्या संरक्षणाची जबाबदारी होती राजा अंभी वर...हा तोच राजा अंभी ज्याने अलेक्झांडर समोर शरणागती पत्करली होती. आणि नंतर राजा पोरस आणि अलेक्झांडरमध्ये सुप्रसिद्ध झेलमची लढाई झाली. अलेक्झांडरने पोरस राजावर आक्रमण केले त्यावेळी सुमारे १०,५०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत होते.


असं म्हटलं जात की राजा अंभीक राजा पोरसचा शत्रू होता म्हणून त्यानेच अलेक्झांडरला राजा पोरसवर आक्रमण करण्यास पाचारण केल होत, असाही एक मतप्रवाह आहे.

मोठमोठ्या इमारतींत १० हजार विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील, एवढी व्यवस्था तक्षशिलेत होती. शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय किर्ती मिळवलेल्या या विद्यापिठात प्रवेश मिळवण्याकरता विद्यार्थ्यांची रीघ लागलेली असे.

या विद्यार्थ्यांमध्ये भारतातील, तसेच पूर्वेकडे इंडोनेशिया, व्हिएतनाम, चीन, जपान, तर पश्चिमेकडे इराण, इराक ते ग्रीक आणि रोम पर्यंतचे विद्यार्थी येत असत आणि येथे ८ ते १० वर्षे राहून शिक्षण घेत.
येथील अभ्यासक्रमात १८ शास्त्रे आणि १८ कलांचा अंतर्भाव होता. धर्म आणि तत्त्वज्ञान हे त्या काळचे महत्त्वाचे विषय होते. शिल्पकला आणि स्थापत्यकला यांचे तक्षशिलेत दिले जाणारे शिक्षण आजच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दिल्या जाणार्‍या विषयांशी मिळत-जुळते होते. 


वेद, वेदांत, धम्मपद, दर्शन, व्याकरण, अर्थशास्त्र, ज्योतिष, आयुर्वेद, ललित कला, हस्त विद्या, पशुभाषा, अश्व विद्या, मंत्र विद्या, युद्ध विद्या, राजनीति, शल्यक्रिया, शस्त्र संचालन, विविध भाषा, गणित यासारख्या विद्या ही इथे शिकवल्या जात. 

तक्षशिला राजनीती आणि शस्त्र विद्या शिकायचं प्रमुख केंद्र होत. तसेच आयुर्वेद आणि विधी शास्त्र यांची ही विशेष विद्यालये तक्षशिलेत होती. 

तक्षशिलेला एवढे मोठे स्थान प्राप्त होण्याचे प्रमुख कारण म्हणजे या विद्यापीठाला लाभलेले विद्वान आणि ऋषीतुल्य शिक्षक. या शिक्षकांची प्रशंसा तत्कालीन सिसरो, प्लिनीसारख्या पाश्चात्त्य पंडितांनी ही केलेली आहे. 

या तक्षशिलेचे प्रसिद्ध विद्यार्थी म्हणजे आचार्य चाणक्य आणि संस्कृत पंडित पाणिनी. या विद्यापीठाला नावारूपास आणण्याचे काम चाणक्य ऊर्फ कौटिल्य यांनी केले होते. इसवी सन पूर्व ४०० मध्ये संस्कृत पंडित कात्यायन यांनी संस्कृत शब्दकोश लिहील्याचा उल्लेख ही आढळतो.


या विद्याकेंद्रावर इराणी, ग्रीक, शक, कुशाण, हूण यांसारख्या परकीयांनी सतत आक्रमण होत राहिली. मात्र ७ व्या शतकात इस्लामी आक्रमक मोहम्मद बिन कासिमने त्याकाळी हिंदु आणि बौद्ध बहुल भाग (आताचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान) आक्रमण करून काबीज केला.

मोहम्मद बिन कासिम नंतर गझनवी आणि मोहम्मद घोरीने "गजवा ए हिंद" च्या नावाखाली अमानुष अत्याचार करत सिंध आणि बलोच प्रांतात लुटपाट केली. त्यात त्यांनी हिंदू मंदिरे, बौद्ध मठ आणि स्तूप फोडले.


पूर्वीच्या काळी "बुद्ध पूजा" या शब्दाचा अपभ्रंश करत अरब इस्लामींनी त्याला "बुदपरस्ती" म्हटले. आणि स्वतःचा धर्म श्रेष्ठ ठरवण्यासाठी गौतम बुद्धांच्या हजारो मुर्त्या फोडल्या. इस्लामी आक्रमणांनी इसवी सन ७०० च्या सुमारास हे विद्यापीठ नष्ट केले.

जेव्हा ७ व्या शतकाच्या उत्तरार्धात चिनी पर्यटक "हेनसांग" भारतात आला तेव्हा त्याला भारताचे हे सर्वात प्राचीन विश्वविद्यालय नामशेष झालेले मिळाले. 

जेवढी हानी इस्लामी आक्रमकांनी बौद्ध संस्कृतीची केली तेवढी कुठल्याच आक्रमकांनी केली नसेल. इस्लामी आक्रमकांच्या सततच्या हल्ल्यांनी एकेकाळी परम वैभवाला असणारा बौद्ध धर्म सर्वच क्षेत्रांतून कमी झाला.

संदर्भ :
  • ग्लोबल हेरीटेज
  • मराठी विश्वकोश

टिप्पण्या

  1. आपण इतक्या संपन्न संस्कृती चे वारसदार आहोत याचा अभिमान आणि वैषम्य एकाच वेळेस वाटतं.

    छान माहिती, मांडणी/ लिखाण.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरियाची भारतीय महाराणी

हजारो वर्षापूर्वी घडलेल्या रामायणाचा, प्रभू श्री रामांचा इतिहास आपणा सर्वाना माहितच आहे, पण आज आपण अयोध्येच्या इतिहासातील एका दुर्लक्षित अध्यायाकडे पाहूया...!! सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. ज्या वंशात राणी सुरीरत्ना यांचा विवाह झाला त्याला दक्षिण कोरियात "करक वंश" या नावाने ओळ्खल जात. या करक वंशाकडे दक्षिण आणि उत्तर कोरियातील बऱ्याच भूभागाची खूप वर्ष सत्ता होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील "किम" आडनावाची लोक करक वंशातील आहेत अस मानल जात. "किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात. राण...

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...