मुख्य सामग्रीवर वगळा

नालंदा विश्वविद्यालय

"नालंदा" हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किमी अंतरावर असून तेथेच विश्वविद्यालयाची वास्तू होती. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विश्वविद्यालयाची स्थापना झाली होती.



सम्राट हर्षाच्या काळात हे विश्वविद्यालय भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विश्वविद्यालयाचे नाव "नलविहार" असे होते. नालंदाच्या सुमारे ३५ एकर क्षेत्रात दहा मंदिरे, विविध प्रकारचे बाग बगीचे, वसतिगृह
आणि ग्रंथालय होते. नालंदाच्या ग्रंथालयाच्या नाव होते "धर्ममायायोग".

धर्ममायायोगमध्ये अनेक इमारती होत्या. त्यातील काही इमारती तर ९ मजल्यापर्यंत उंच होत्या अस म्हटलं जात. या धर्ममायायोगमध्ये शास्त्र, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, कला, वाणिज्य, भाषा यावर सुमारे ९० लाख ग्रंथ पुस्तके असल्याचा अंदाज आहे.



नालंदा मध्ये शिक्षण मोफत होत. या विश्वविद्यालयाचा सर्व खर्च सम्राट हर्षवर्धनने दान दिलेल्या शंभर खेड्यांच्या माध्यमातून भागवला जाई. या खेड्यातील लोक विश्वविद्यालयाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवीत.


विश्वविद्यालयात सुमारे १०,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते, त्यातले ३००० तर विश्वविद्यालयाच्या वस्तीगृहात रहात होते. जवळपास २००० शिक्षक वृंद तिथे अध्यापनाचे काम करत होता. प्रवेश देण्यासाठी कठीण अशी द्वारपरीक्षा घेतली जात असे.
या अशा जगभरात नावलौकिक मिळवलेल्या विश्वविद्यालयात शिक्षण घेणाऱ्यांत चीन, जपान, कोरिया व तिबेट यासह जगभरातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

परंतु इसवी सन ११९३ साली या संपूर्ण जगास हेवा वाटणाऱ्या नालंदा विश्वविद्यालयावर बख्तियार खिलजी या मुघल आक्रमकाची वक्रदृष्टी पडली. नालंदावर आक्रमण करून त्याने नालंदा बेचिराख केल. शिक्षकांवर पाशवी अत्याचार करून त्यांच शीर धडावेगळ करून फेकून दिल गेल.


इतकी विराट ग्रंथ संपदा असणारी नालंदाचे ग्रंथालय कित्येक महिने जळत होत. आपले कितीतरी शोध यात नष्ट झाले. ज्ञान संपदेच अतोनात नुकसान झाल.
विचार करून पहा जर गुगल, विकिपीडिया एका क्षणार्धात नष्ट झाल आणि याचा backup आपल्याला घेता नाही आला तर आपली काय अवस्था होईल?

मग नालंदा जळल्याच्या आघाताने आपली वैभवशाली सभ्यता किती वर्ष मागे गेली असेल? 

नालंदा शेजारीच एक ठिकाण आहे बख्तियारपूर...

ज्या बख्तियार खिलजी नालंदा विश्वविद्यालय उध्वस्त केल त्याच्या नावावर हे शहर असाव? जगाच्या पाठीवर दुसरा असा देश सापडेल जो इतक्या पाशवी आक्रमकाचे नाव स्वत:च्या शहराला देईल?


नालंदा तर फक्त एक विश्वविद्यालय आहे. भारतावर हजारो वर्ष परकीय आक्रमणे होत आली आहेत. खूप पद्धतशीर पणे आपली संस्कृती, आपला वैभवशाली इतिहास संपवण्याच काम आजही सुरूच आहे. अगदी एखाद्या शाळेत संस्कुत मंत्राच उच्चारण हि आजकाल कम्यूनल मानल जाऊ लागल आहे. 

आपल्यातील बरेच महाभाग असेही आहेत जे म्हणतात जे झाल ते झाल उगाच जुन्या गोष्टी उगाळून काय साध्य होणार आहे?

पण जर आपल्याला आपला गौरवशाली इतिहासच माहिती नसेल तर आपण आपले भविष्य गौरवशाली घडवू शकणार नाही, या मतावर मी मात्र ठाम आहे...

संदर्भ :
  • प्राचीन भारत का राजनीतिक और सांस्कृतिक इतिहास - क.मा.मुन्शी, आर.सी.मुजुमदार
  • मराठी विश्वकोश

टिप्पण्या

  1. खुप छान माहिती.
    आपणच आपणाला विसरत चाललो आहोत.
    कठीण आहे भारत देशाच. ज्याने जाळले त्याच नाव एका गावाला 'ह्या गोष्टी साठी तर भारत रत्न' द्यायला पाहिजे. आपण भारतीय म्हणजे त्या मृगा सारखे आहे, ज्याच्या जवळ कस्तुरी असून सुध्धा त्याच्या शोधात वन भर फिरते.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रथमत: आपले आभार..!! आपल्या इतिहासाची गौरवगाथा सर्वदूर पोहोचावी म्हणूनच हा छोटासा प्रयत्न करतोय..!!🙏

      हटवा
  2. नालंदा विद्यापीठ काही दिवसांपूर्वी एक वेगळ्याच, वाईट गोष्टी साठी बातम्यांमधे होते.

    तुम्ही विद्यापीठाची सविस्तर चांगली ओळख करून दिलीत.

    तुमचे लेख वाचनीय, माहितीपूर्ण असतात.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरियाची भारतीय महाराणी

हजारो वर्षापूर्वी घडलेल्या रामायणाचा, प्रभू श्री रामांचा इतिहास आपणा सर्वाना माहितच आहे, पण आज आपण अयोध्येच्या इतिहासातील एका दुर्लक्षित अध्यायाकडे पाहूया...!! सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. ज्या वंशात राणी सुरीरत्ना यांचा विवाह झाला त्याला दक्षिण कोरियात "करक वंश" या नावाने ओळ्खल जात. या करक वंशाकडे दक्षिण आणि उत्तर कोरियातील बऱ्याच भूभागाची खूप वर्ष सत्ता होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील "किम" आडनावाची लोक करक वंशातील आहेत अस मानल जात. "किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात. राण...

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...