मुख्य सामग्रीवर वगळा

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई.


चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे.

तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे.

चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे.

स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत. त्यांनी गोवळकोंडा व विजापूर येथील शाहीसत्ता आणि खानदेश व कोकणातील पोर्तुगीज यांच्याकडून चौथाई वसूल केली होती. या चौथाईच्या बदल्यात गोवळकोंडा व विजापूर यांना मोगलांविरुद्ध मदतही केली. 

नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौथाई देणाऱ्या राज्यांवर स्वारी करणार नाही, या अटीवर चौथाई वसूल करू लागले. छत्रपती शिवाजी महाराजाच्या पश्चात छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज हे ही या पद्धतीप्रमाणे चौथाई वसूल करत असत.

सन १७१९ मध्ये दिल्लीच्या बादशाहने आपल्या दक्षिण भारतातील ६ सुभ्यांवरील चौथाई सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार छत्रपती शाहू महाराजांना दिले होते. मात्र इंग्रजांच्या आगमनानंतर व मराठेशाहीच्या शेवटच्या काळात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावांकडून चौथाई सरदेशमुखीचे सर्व हक्क १८०२ मध्ये काढून घेतले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरियाची भारतीय महाराणी

हजारो वर्षापूर्वी घडलेल्या रामायणाचा, प्रभू श्री रामांचा इतिहास आपणा सर्वाना माहितच आहे, पण आज आपण अयोध्येच्या इतिहासातील एका दुर्लक्षित अध्यायाकडे पाहूया...!! सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. ज्या वंशात राणी सुरीरत्ना यांचा विवाह झाला त्याला दक्षिण कोरियात "करक वंश" या नावाने ओळ्खल जात. या करक वंशाकडे दक्षिण आणि उत्तर कोरियातील बऱ्याच भूभागाची खूप वर्ष सत्ता होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील "किम" आडनावाची लोक करक वंशातील आहेत अस मानल जात. "किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात. राण...

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...