मुख्य सामग्रीवर वगळा

सनातन धर्माला नवसंजीवनी देणारा - पुष्यमित्र शुंग

    प्राचीन भारताचा इतिहास इतका समृद्ध आहे कि, प्रत्येक कालखंडात आपल्याला अनेक शूरवीर योद्धे पाहावयास मिळतात. अनेक शूरवीर काळाच्या ओघात विस्मृतीतही गेले. त्यातीलच एक म्हणजे शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती पुष्यमित्र शुंग.... 


    मौर्य वंशानंतर ख्रि. पू. सु. १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. तत्पूर्वी आचार्य चाणक्य यांच्या निधनानंतर अखंड हिदुस्तानाची त्यांची कल्पना क्षीण झाली होती. चंद्रगुप्त मौर्याने ही जैन धर्माचा स्वीकार केला होता. चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा बिंदुसार गादीवर येताच त्याने राज्याच्या सीमा दक्षिणेपर्यंत वाढवल्या. या पराक्रमी राजाच्या काळात मौर्य साम्राज्याने अनेक राज्ये जिंकून घेतली. त्यानंतर गादीवर बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक आला. पराक्रमी असणाऱ्या सम्राट अशोकाने कलिंगच्या युध्दानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर सुमारे २० वर्ष सम्राट अशोकाने राज्य केले. 

    ज्या भारतभूमीत जग जिंकायला निघालेला ग्रीकचा अलेक्झांडर ही पराभूत झाला तिथले शूरवीर मौर्य साम्राज्याच्या पराकोटीच्या अहिंसेमुळे लढण्याची क्षमताच गमावून बसले होते. यामुळे मौर्य वंशातील अखेरचे राजे अत्यंत निर्बल बनले. मौर्य वंशाच्या या उतरत्या काळात डीमीट्रिअस या ग्रीक राजाने उत्तर भारतावर स्वारी करून अयोध्या, मथुरा व पांचाल हे प्रदेश पादाक्रांत करत थेट पाटलीपुत्रापर्यंत धडक मारली.

    पुष्यमित्राला त्याच्या गुप्तचरांकरवी माहिती कि, ग्रीक सैन्य बौद्ध भिक्षूंच्या रूपात वेषांतर करून मठात लपून बसले आहेत, त्याने राजा बृहदरथ कडे मठांची झडती घेण्याची परवानगी मागितली. मात्र राजा बृहदरथने यास साफ नकार दिला.तरीही पुष्यमित्राने मठात सैन्य घुसवले आणि त्याचे व वेषांतर केलेल्या ग्रीक सैन्याचे युद्ध झाले. यावर चिडलेल्या  राजा बृहदरथने पुष्यमित्राशी युद्ध छेडले मात्र यात राजा बृहदरथ धारातीर्थी पडला आणि सेना पुष्यमित्राच्या बाजूने असल्याने आपसूकच पुष्यमित्र सम्राट बनला.

 पुष्यमित्र सम्राट बनताच त्याने वैदिक सनातन धर्मास नवसंजीवनी दिली.

पुष्यमित्र शुंगाचे शिल्प 

    शेवटच्या मौर्य राजांच्या कारकीर्दीत मगध राज्याचा विस्तार होण्याऐवजी संकोच झाला होता पण सेनापती पुष्यमित्राने सूत्रे हातात घेताच आपली सत्ता दूरवर पसरविली. मध्य भारतातील विदिशा येथे त्याचा पुत्र अग्निमित्र प्रांताधिपती म्हणून राज्य करत होता. पुष्यमित्राच्या सहाव्या वंशजाचा लेख अयोध्येस सापडला आहे. दिव्यावदान  ग्रंथावरून त्याचा अंमल पंजाबात जालंधर आणि सियालकोट पर्यंत पसरला असल्याचे दिसून येते.

    सेनापती पुष्यमित्राने २ अश्वमेघ यज्ञ केल्याचा उल्लेख अयोध्येच्या लेखात आहे. मात्र तरीही त्याने आपली सेनापती’ ही पदवी बदलली नाही. संत कालिदासांचे मालविकाग्निमित्र  नाटक तत्कालीन घटनांवर आधारलेले आहे. त्यातही पुष्यमित्राचा उल्लेख सेनापती पुष्यमित्र असाच केल्याचा आपल्याला आढळून येतो. तत्कालीन पुराव्यांच्या आधारे त्याने ३६ वर्ष शासन केल्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो.

    पुष्यमित्राच्या कालखंडात वैदिक धर्म आणि संस्कृत भाषेला नवसंजीवनी मिळाली. त्याने अशोकाचे हिंसाविरोधी निर्बंध बदलून वैदिक यज्ञ यागास परवानगी दिली आणि स्वतःही अश्वमेघा सारखे यज्ञ केले. पतंजलीच्या महाभाष्य  "इदं पुष्यमित्रं याजयामः|: असे उदाहरण आले आहे. त्यावरून त्याच्या यज्ञांत पतंजलीने स्वतः ऋत्विजाचे काम केले होते, असा अनुमान काढता येतो.

    पुष्यमित्राने बौद्धांचा छळ केला, असाही एक मतप्रवाह आहे. पुष्यमित्राने पाटलीपुत्रातील कुक्कुटाराम नामक बौद्ध विहार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, अनेक बौद्ध विहार उद्ध्वस्त करून बौद्ध भिक्षूंची कत्तल केली होती. तर काही बौद्धांनी ग्रीकांना छुपी मदत केली म्हणून पुष्यमित्राने बौद्धांना दंडीत केल्याचं ही आपणास ऐकावया मिळते. मात्र या दंतकथांना समकालीन पुरावे आजमितीस उपलब्ध नाहीत. 

    मात्र काही डाव्या सेक्युलर लोकांनी पुष्यमित्र ला खलनायक दाखवायचा प्रयत्न केला. कोणत्याही सबळ पुराव्यांअभावी त्याला कट्टर सनातनी दाखवत, बौद्ध धर्मद्वेषी असल्याचे दाखवले गेले.

सांची स्तूप, मध्यप्रदेश 

    मात्र भारहुत आणि सांची येथील तत्कालीन बांधलेल्या स्तूप आपल्याला वेगळीच कहाणी सांगतात. भारहुत येथील तोरणावर तर ":सुंगानं रजे|" म्हणजेच शुंगांच्या राज्यात असा स्पष्ट उल्लेख आहे. याचाच अर्थ पुष्यमित्र स्वधर्माभिमानी असला तरी इतर धर्मांचा द्वेष करत नव्हता असाच होतो.

संदर्भ : The Age of Imperial Unity, OpIndia 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोरियाची भारतीय महाराणी

हजारो वर्षापूर्वी घडलेल्या रामायणाचा, प्रभू श्री रामांचा इतिहास आपणा सर्वाना माहितच आहे, पण आज आपण अयोध्येच्या इतिहासातील एका दुर्लक्षित अध्यायाकडे पाहूया...!! सुमारे २००० हजार वर्षापूर्वी अयोध्येची राजकुमारी असणाऱ्या सुरीरत्नाचा कोरियाचे महाराज किम सुरो यांच्याशी झाला. आणि याची नोंद सापडली ते १३ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या चायनीज दस्तऐवज "सामगुक युसा" मध्ये. त्यात असा उल्लेख आहे कि अयोध्येच्या राजाला दैवी दृष्टांत झाला आणि नंतर राजकुमारी सुरीरत्ना आणि दक्षिण कोरियाचे राजे किम सुरो यांचा दक्षिण कोरियातील किम-ह्ये या शहरात मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. ज्या वंशात राणी सुरीरत्ना यांचा विवाह झाला त्याला दक्षिण कोरियात "करक वंश" या नावाने ओळ्खल जात. या करक वंशाकडे दक्षिण आणि उत्तर कोरियातील बऱ्याच भूभागाची खूप वर्ष सत्ता होती. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील "किम" आडनावाची लोक करक वंशातील आहेत अस मानल जात. "किम-ह्ये" या शहरात राणी सुरीरत्ना यांची समाधी आहे आणि तेथील लोक या समाधीला अयोध्येचा दगड वापरल्याच आवर्जून सांगतात. राण...

चौथाई – सरदेशमुखी

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. मात्र स्वराज्याचा खर्च कुठून येत असे याबद्दल मात्र आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नसेल. पूर्वी कुठलेही राज्य म्हटले कि त्या राज्याला सैन्यबळ गरजेचे असे. सैन्याबळातील सैनिक, हत्यारे, घोडे, हत्ती ई.चा खर्च आणि राजदरबाराचा सर्व खर्च भागवण्यासाठी चौथाई सरदेशमुखी आकारली जाई. चौथाई म्हणजे एकचतुर्थांश भाग.... एकूण उत्पनाच्या एकचतुर्थांश भाग वसूल करण्याची पद्धती म्हणजेच चौथाई... चौथाई ची पूर्ण रक्कम राज्याच्या दौलती मध्ये जमा केली जात असे. तर सरदेशमुखी मध्ये एकूण उत्पनाच्या एक दशांश भाग वसूल केला जात असे. सरदेशमुखीची संपूर्ण रक्कम छत्रपतींच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये जमा केली जात असे. चौथाई आणि सरदेशमुखी या जरी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांची वसुली मात्र एकत्रच केली जात असे. स्वराज्याबाहेर पण स्वराज्याच्या छत्रछायेखाली असलेल्या प्रदेशांतून चौथाई सरदेशमुखी वसूल केली जात असे.छत्रपती शिवरायांनी दमण वसई जिंकल्यानंतर पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी केली आणि जिंकलेल्या प्रदेशातील लोकांना संरक्षण देण्याकरिता महाराज त्यांच्याकडून चौथाई वसूल करीत....

बोथाटी - मराठ्यांचा लुप्त झालेला मर्दानी खेळ

बोथाटीचा उगम भारतात साधारणत: मुसलमानी अंमल असताना झाला असे मानले जाते. मात्र या मर्दानी खेळाची खरी जोपासना झाली ती म्हणजे मराठेशाहीत.... त्या काळी ज्या लढाया होत, त्यात घोड्यांचा वापर प्रचंड प्रमाणात होत असे. आणि घोडेस्वाराचे प्रमुख हत्यार भाला हे असे. युद्ध करताना घोडेस्वाराला भाला चांगल्या प्रकारे हाताळता येणे गरजेचे आहे ओळखून बोथाटीचा खेळ निघाला. त्यावेळी युद्धप्रसंगास केव्हाही सामोरे जावे लागत असे, परकीय शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करेल याचा काहीच अंदाज नसे. म्हणून त्यावेळी सैनिक आपल्याला शस्त्रासांसह दैनंदिन सराव करत असत. घोडेस्वारांचा भाल्याचा वार करण्याचा आणि तो चुकविण्याचा सराव व्हावा, म्हणून भाल्याचे टोकदार लोखंडी टोक काढून टाकून त्या ऐवजी भाल्यास चिंध्याचे कापडी गोळे किंवा लाकडी गोळे बांधून तो भाला फिरवण्याचा सराव घोडेस्वार करीत असत. अशा भाल्याचे टोक बोथट असल्याने या खेळास "बोथाटी" हे नाव पडले. घोडेस्वारांच्या अशा दैनंदिन सरावातूनच बोथाटीला खेळाचे स्वरुप प्राप्त झाले आणि अल्पावधीतच हा खेळ एक मर्दानी क्रिडाप्रकार म्हणून मान्यता पावला. या खेळामुळे घोडेस्वारास भाल्याचे व...