भारतात अनेक थोर पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले. आपल्याला सातत्याने त्यांच्याबद्दल ग्रंथ, पुस्तके आणि चित्रपटांमधून माहिती मिळतच असते. परंतु आठव्या शतकात एक असा पराक्रमी राजा होऊन गेला ज्याने मोहम्मद बिन कासीम ला तीन युद्धात हरवले आणि कित्येक वर्ष भारतात येण्यापासून रोखून धरले. परंतु या महापराक्रमी राजाची आपण भारतीयांनी म्हणावी तशी दखल घेतली नाही. आपल्या शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात एक ओळ ही या राजाच्या नशिबी आली नाही. राजा चाच यांचे साम्राज्य सहाव्या शतकात सिंधच्या श्रेष्ठ राजा चाचने सिंध, बलोच व पलीकडे इराणचादेखील थोडा भाग आपल्या अखत्यारीत आणला. याचा मुलगा राजा दाहिरच्या काळात मुहम्मद बिन कासीमने सिंधवर आक्रमण केले. या आधी हि त्याने ३ वेळा आक्रमण करून पराभवाची चव चाखली होती. मात्र यावेळी आक्रमण करताना त्याने सोबतीला अनेक छोटे मोठे कबिले आणि बौध्द राजे घेतले होते. त्यामुळे त्याचे सैन्यबळ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाले होते. राजा दाहीर साल होते इ.स. ७१२. राजा दाहीरला त्याच्या मंत्र्याने सांगितले, ''तुझ्या कुटुंबीयांना राजस्थामधील हिंदू राजांकडे आश्रयाला पाठव. तू अर...